श्रीलंकेत ६ मार्चपासून तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत श्रीलंका, बांग्लादेश आणि भारत हे तीन संघ सामील होणार आहेत. या मालिकेसाठी आज भारताचा संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे.
बीसीसीआयने ट्विटरवरून भारतीय खेळाडूंचे एअरपोर्टवरील फोटो शेयर केले आहेत. या तिरंगी मालिकेचे नाव निदाहास ट्रॉफी असून ही मालिका श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळवण्यात येणार आहे.
And we are all ready to Jet Set Go! 🇱🇰 Here we come! #TeamIndia pic.twitter.com/GI1iczAmNC
— BCCI (@BCCI) March 4, 2018
या मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. विराट बरोबरच या मालिकेसाठी एम एस धोनी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दीक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे.
या मालिकेतील सलामीचा सामना श्रीलंका विरुद्ध भारत असा ६ मार्चला होणार असून या तिरंगी मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील. प्रत्येक संघ एकमेकांशी दोन सामने खेळेल.
या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना १८ मार्चला होणार आहे.
अशी असेल निदाहास ट्रॉफी स्पर्धा
६ मार्च – श्रीलंका विरुद्ध भारत
८ मार्च -बांगलादेश विरुद्ध भारत
१० मार्च -श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
१२ मार्च – भारत विरुद्ध श्रीलंका
१४ मार्च – भारत विरुद्ध बांगलादेश
१६ मार्च – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१८ मार्च – अंतिम सामना