---Advertisement---

हरमनप्रीत आणि रेणुकाचे प्रयत्न व्यर्थ, ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारतावर मिळवला थरारक विजय

Ashleigh-Gardner
---Advertisement---

बर्मिंघम| भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कॉमनवेल्थ गेम्स २०२२मधील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने फलंदाजीतील झुंजार प्रदर्शनानंतर गोलंदाजीत चांगली सुरुवात केली. परंतु ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ऍश्ले गार्डनर हिच्या ताबडतोब खेळीमुळे भारतीय संघाला हातात असलेला सामना गमवावा लागला. ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने हा सामना जिंकला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने १९ षटकातच ७ विकेट्स गमावत भारताचे लक्ष्य पूर्ण केले.

भारताच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर हिने मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली. तिने नाबाद ५२ धावांची झटपट खेळी केली. या खेळीसाठी तिने केवळ ३५ चेंडूंचा सामना केला आणि ९ चौकार मारले. तिच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. तिच्याबरोबरच खालच्यी फळीत ग्रेस हॅरिस हिने २० चेंडूत ३७ धावा फटकावल्या. तर गोलंदाज ऍलाना किंग हिनेही नाबाद १८ धावांची उपयुक्त खेळी खेळली.

या डावात भारताकडून रेणुका सिंग हिने प्रशंसनीय गोलंदाजी प्रदर्शन केले. ४ षटके फेकताना फक्त १८ धावा खर्च करत तिने ऑस्ट्रेलियाच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडले. तसेच दिप्ती शर्मानेही २ महत्त्वाच्या विकेट्स काढल्या होत्या.

तत्पूर्वी भारताकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक धावा फटकावल्या. तिने ३४ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तसेच सलामीवीर शेफाली वर्माने ३३ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले. यादरम्यान तिने ९ चौकारही मारले. तसेच सलामीवीर स्म्रीती मंधानाने २४ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही.

या डावात ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासन हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. ४ षटके फेकताना २२ धावा खर्च करत तिने ४ विकेट्स काढल्या. तसेच मेघन शट आणि डार्सी ब्राउन यांनी प्रत्येकी २ व १ विकेट काढल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! हरमनप्रीतने अर्धशतक करत मिळवला ‘हा’ बहुमान, ठरली पहिलीच भारतीय क्रिकेटर 

पहिली आणि एकमेव! मितालीलाही जे जमलं नाही, ते हरमनप्रीतने केलं; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास

रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---