भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकून क्रिकेट विश्वात मानाचा तुरा रोवला आहे. टीम इंडियाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून विश्वचषक आपल्या नावे केला. चक्री वादळामुळे भारतीय संघ तब्बल 5 दिवसांनी आज (4 जुलै) भारतात दिल्लीमध्ये दाखल झाला. यानंतर टीम इंडिया पंतप्रधान मोंदी यांची भेट घेतली आहे.
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी 29 जून रोजी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन भारतीय संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले होते. वास्तविक भारतीय संघ आज 4 जुलै दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर दाखल झाल्यानंतर ट्राॅफीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंचे मोदींनी काैतुक केले.
INDIAN TEAM MEETING PM NARENDRA MODI. 🇮🇳
– A Proud moment…!!!! pic.twitter.com/3sOZkG9An6
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये भारतीय संघ सोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यावेळी सोबत होते. भारतीय संघ पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करताना पहायला मिळाले.
तत्तपूर्वी, भारतीय संघाला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडिया खुप निराश आणि भावुक झाली होती. त्यावेळी मोदींनी भारतीय संघाची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेऊन टीम इंडियाला धिर दिले होते.
चॅम्पियन संघ पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुंबईकडे रवाना झाली आहे. सायंकाळी मुंबईमध्ये पोहचताच टीम इंडियाची खुल्या बसमधून विजयी परेड होणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने संघासाठी घोषित केलेल्या 125 कोटी धनादेशाचा वाटप करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियानं बार्बाडोसहून ज्या विमानानं प्रवास केला, त्यानं बनवला मोठा विक्रम! जाणून घ्या
तुम्ही वानखेडेवर टीम इंडियाचा विजयोत्सव प्रत्यक्ष पाहू शकता का? पाहा काय आहे प्रोसेस
तो क्षण जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला होता, कपिल देव यांच्या नेतृत्वात केले होते विक्रम