वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (27 जुलै) सुरुवात होईल. कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर या मालिकेत देखील सरशी साधण्याचा रोहित शर्मा व भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यासोबतच भारतीय संघ आपल्या मिशन वर्ल्डकपला प्रारंभ करेल. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात उतरण्यापर्यंत भारतीय संघ कोणाकोणाशी खेळणार हे आपण पाहूया.
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान पहिला वनडे सामना 27 जुलै रोजी होईल. तर, दुसरा सामना 29 जुलै रोजी खेळला जाईल. हे दोन्ही सामने बार्बाडोस येथे होणार आहेत. मालिकेतील अखेरचा सामना एक ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथे होईल. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरूद्धच पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यानंतर आयर्लंड दौऱ्यावर भारत तीन टी20 सामने खेळेल.
त्यानंतर भारतीय संघासमोर मोठे आव्हान असेल ते आशिया चषक जिंकण्याचे. यावेळी आशिया चषक वनडे प्रकारात होईल. आशिया चषकात भारत नेपाळ व पाकिस्तानविरुद्ध दोन साखळी सामने खेळेल. त्यानंतर सुपर फोर फेरीत भारताला आणखी तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास आणखी एक सामना खेळता येईल.
आशिया चषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. याच मालिकेत भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या तयारीवर अखेरचा हात फिरवेल. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ विश्वचषकाच्या आधी इंग्लंड आणि नेदरलँडविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. भारत आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध करेल.
याचाच अर्थ भारत विश्वचषकातील पहिला सामना खेळण्याआधी जास्तीतजास्त 17 वनडे सामने खेळणार आहे.
(Team India Mission World Cup Start Today Against West Indies)
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा
वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण