आज 2022 वर्षाचा शेवटचा दिवस. क्रिकेटमध्ये यावर्षात अनेक विक्रम रचले गेले आणि काही जुने विक्रम मोडले गेले. 22 यार्डच्या त्या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज यांनी विशेष कामगिरी केली. या वर्षाच्या शेवटी टी20 विश्वचषक खेळला गेला. त्याआधीही काही स्पर्धा झाल्या, ज्यामध्ये संघांनी चांगली खेळी केली. आतापर्यंत सर्व संघांनी त्यांचे-त्यांचे शेवटचे सामने खेळले आहेत. यामुळे यावर्षी सर्वाधिक सामने कोणी जिंकले हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असालच. या यादीत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे.
भारताने यावर्षी विविध प्रकाराचे मिळून सर्वाधिक सामने जिंकले, मात्र संघााला एकही आयसीसी किंवा आशियाई स्पर्धा जिंकता आली नाही. यादरम्यान भारताने ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधीही गमावली. वर्षाच्या मधल्या काळात भारताला इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी जिंकण्याची संधी होती, मात्र भारताने तो सामना गमावला आणि मालिकाही.
यावर्षी सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तसेच न्यूझीलंड विरुद्ध वर्षातील शेवटचा सामना खेळणाऱ्या पाकिस्तानला मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ड्रॉवर समाधान मानावे लागले. यानंतर ते या यादीत पाचव्या स्थानावर कायम राहिले.
2022 वर्षात भारताने एकूण 71 सामने खेळले. ज्यातील 46 सामने जिंकत भारताने सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला. यावर्षात भारत नवनव्या कर्णधारांच्या मार्गदर्शनाखाली खेळला. यावर्षी भारताचे नेतृत्व तब्बल 7 कर्णधारांनी केले. जो एक विक्रम ठरला. तसेच भारताने आशिया कप आणि टी20 विश्वचषक खेळले, मात्र या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचला नाही.
सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलियाने 30, इंग्लंडने 29, न्यूझीलंडने 27 आणि पाकिस्तानने 23 सामने जिंकले आहेत. तसेच आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर यावर्षी सर्वाधिक सामने जिंकले गेले आहेत. (Teams who have won the most international matches in a single year)
एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारे संघ-
46 – (भारत, 2022)
38 – (ऑस्ट्रेलिया, 2003)
37 – (भारत, 2017)
35 – (ऑस्ट्रेलिया, 1999)
35 – (भारत, 2018)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतची मदत करणाऱ्यांचा विशेष सन्मान, लक्ष्मणनेही ट्वीट करत मानले आभार
रिषभ पंत हेल्थ अपडेट: पंतच्या मेंदू, पाठीच्या कण्याचे एमआरआय स्कॅन रिपोर्ट्स आले समोर