---Advertisement---

पंतची मदत करणाऱ्यांचा विशेष सन्मान, लक्ष्मणनेही ट्वीट करत मानले आभार

Sushil Kumar & Paramjit Singh who helped Rishabh Pant
---Advertisement---

भारतीय विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याची अपघातस्थळी मदत करणाऱ्या उत्तराखंडच्या डीजीपी अशोक कुमार यांनी सन्मान केला आहे. त्या दोघांचा रोड परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयद्वारा केंद्रीय सरकारच्या योजनेअंतर्गत त्यांचा सन्मान केला गेला. पंतचा शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर अपघात झाला. यानंतर त्याला बस ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत सिंग यांनी मदत केली. या दोघांनी त्याच्यासाठी ऍम्ब्युलन्स बोलावली.

पंत त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीडे एकटाच निघाला होता. वाटते त्याला गाडी चालवताना झोपेची डुलकी आल्याने त्याची कार डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला गेली. यावेळी तो खिडकीची काच तोडून बाहेर आला. या अपघातात त्याची गाडीही जळून खाक झाली. तेव्हा तेथील उपस्थित लोकांनीही सुशील आणि परमजीत यांची मदत केली. या दोघांचे चाहते कौतुक करत असून भारतीय दिग्गजानेही त्यांचे आभार मानले आहे.

पंतला मदत केल्याबद्दल राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे (एनसीए) अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी सुशील आणि परमजीत यांचे आभार मानले आहे. त्याने ट्वीट करत लिहिले, “सुशील कुमारचे आभार, जे हरियाणातील एका बसचे ड्रायव्हर असून त्यांनी जळत्या गाडीतून पंतला बाहेर काढत ऍम्ब्युलन्सला बोलावले. तसेच कंडक्टर परमजीत यांचेही आभार. ज्यांनी सुशील यांच्या साथीने पंतची मदत केली.”

पंतला या अपघातात मोठा मार लागला असून त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी तो स्थिर असल्याचे आणि त्याच्या तब्येतीत सुधार होत असल्याचा निर्वाळा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) निवेदन जाहीर करत तो ठीक असल्याचे म्हटले आहे.

या अपघातात पंतच्या गुडघ्यालाही दुखापत झाली. तसेच त्याच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली गेली. त्याला अपघातानंतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले होते. नंतर त्याला दिल्लीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

(A special honor to those who helped Rishabh Pant after accident, VVS Laxman also tweeted his thanks)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंत हेल्थ अपडेट: पंतच्या मेंदू, पाठीच्या कण्याचे एमआरआय स्कॅन रिपोर्ट्स आले समोर
असा एक खेळाडू ज्याचे पदार्पण 17 व्या वर्षी झाले, पण कारकिर्द राहिली केवळ 4 वर्षांची

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---