भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे मोठा कार अपघात झाला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला ज्यामधून तो थोडक्यात बचावला आहे. यामध्ये त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याचे एमआरआय स्कॅन रिपोर्ट्स आले आहेत.
रिषभ पंत (Rishabh Pant) याला अपघातात डोके, पाठ आणि पाय याला जबर मार लागला. यामुळे त्याच्या रिपोर्ट्सची सर्वाना प्रतिक्षा होती. ईएसपीएन क्रिकइंफोनुसार, त्याचा मेंदू आणि पाठीचा कणा यांचे एमआरआय स्कॅन रिपोर्ट्स आले आहेत. यामध्ये तो नॉर्मल असल्याचा निकाल दिला आहे. उत्तराखंडच्या रुरकी येथे पंतचा अपघात झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली होती.
यावेळी पंतच्या गुडघा आणि हाताच्या कोपरालाही दुखापत झाली. गुडघा सुजल्याने त्याचे स्कॅन केले गेले नाही, मात्र या भागावर त्याला बरीच जखम झाली आहे. सध्या तरी त्याची स्थिती स्थिर असून तो इतरांनी बोलू शकतो. बीसीसीआयनेही पंतची तब्येत ठीक असल्याचे निवेदन जाहीर केले.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1608827234315554816?s=20&t=BDi7pOdOtyRC0dA1aR6tIw
पंत त्याच्या आईला सरप्राईज देण्यात दिल्लीवरून रुरकीला जात होता. तेव्हा तो एकटाच गाडीमध्ये होता आणि त्याचे नियंत्रण सुटल्याने गाडी डिवायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. तेव्हा त्याने कसेतरी करून खिडकीचा काच तोडला आणि बाहेर आला. तेथील उपस्थित लोकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले, त्यानंतर त्याला दिल्लीच्या खासगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
पंतला नुकतेच श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेतून विश्रांती दिली होती. तो त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन बंगळुरूला एनसीए (राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी) कंडिशनिंग आणि फिटनेससाठी जाणार होता. आता त्याच्या मोठा अपघात झाल्याने तो संघात कधी परतणार हे सांगणे कठीण आहे, मात्र तो जवळपास एक वर्ष तरी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.
( MRI scan result of Rishabh Pant returned “normal” for Brain & spinal cord)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
असा एक खेळाडू ज्याचे पदार्पण 17 व्या वर्षी झाले, पण कारकिर्द राहिली केवळ 4 वर्षांची
हुश्श! एकदाचा रोनाल्डोला मिळाला नवा संघ, सौदी अरेबियाच्या ‘या’ क्लबसोबत केला करार