---Advertisement---

हुश्श! एकदाचा रोनाल्डोला मिळाला नवा संघ, सौदी अरेबियाच्या ‘या’ क्लबसोबत केला करार

Cristiano Ronaldo joined Saudi Arabian club Al-Nassr
---Advertisement---

रियल माद्रिदसोबत पाच चॅम्पियन्स लीग जिंकणारा, क्लबसोबत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करत नवनवे विक्रम रचणारा क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला वादग्रस्तपणे मँचेस्टर युनायटेड सोडावे लागले. यानंतर तो सौदी अरेबियाच्या अल-नासर क्लबमध्ये सामील झाला आहे. या क्लबने रोनाल्डोने केलेला करार शुक्रवारी (30 डिसेंबर) जाहीर केला.

रोनाल्डोने जून 2025 पर्यंत अल-नासर (Al- Nassr) क्लबसोबतच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. याबरोबरच या करारानुसार त्याला दरवर्षी जवळपास 200 मिलियन युरो (1770 कोटी रुपये) मिळतील, ज्यामुळे तो इतिहासातील सर्वाधिक वेतन घेणार खेळाडू ठरेल. 2025 पर्यंत त्याला 4400 कोटी रुपये मिळतील, ज्यामध्ये जाहीरातींचेही मानधन असणार आहे.

“मी नव्या लीगमध्ये वेगळ्या देशात खेळण्यास उत्सुक आहे. अल नासीर सौदी अरेबियात फुटबॉलमध्ये चांगले काम करत आहे. नुकतेच त्यांच्या राष्ट्रीय पुरुष संघाने विश्वचषकात जी उल्लेखनीय कामगिरी केली त्यावरून ते स्पष्ट होते की ते प्रगती करत आहेत. अल-नासर पुरुष संघाबरोबर महिलांच्या फुटबॉलमध्ये चांगले बदल करण्याच्या प्रयत्न करत आहेत,” असे रोनाल्डोने करारानंतर म्हटले.

“युरोपिय फुटबॉलमध्ये मला जे जिंकायचे होते, ते सर्व मी मिळवले. आता मला आशियातील फुटबॉलचा अनुभव घ्यायचा आहे. नवा संघ आणि नवे खेळाडू यांच्यासोबत क्लबला नव्या उंचीवर नेण्यास मी आतुर आहे,” असेही रोनाल्डोने पुढे म्हटले.

मागील काही दिवसांपूर्वी रोनाल्डोने एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्याने युनायडेटबाबत अनेक खुलासे केले. जे पुढे जाऊन वादग्रस्त ठरले आणि त्याला क्लबमधून बाहेर व्हावे लागले. यादरम्यान त्याचे रियल माद्रिद याच्या त्याच्या जुन्या क्लबच्या ग्राऊंडवर एकटा सराव करतानाचे फोटेही व्हायरल झाले होते.

कतारमध्ये झालेल्या विश्वचषकात रोनाल्डो सलग पाच विश्वचषकात गोल करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला, मात्र त्याच्या संघाला उपउपांत्य फेरीतूनच बाहेर पडावे लागले. या स्पर्धेनंतरच त्याने नव्या क्लबशी करार करण्याचा निर्णय घेतला.

(Cristiano Ronaldo joined Saudi Arabian club Al-Nassr)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा, टी20 विश्वचषकासह ‘या’ तीन वर्ल्डकप स्पर्धांनीही गाजवले 2022 वर्ष
ईस्ट बंगालचा बंगळूरुवर निसटता विजय, प्ले-ऑफच्या आशा कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---