भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला जुलै महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये भारत आणि श्रीलंका प्रत्येकी 3-3 टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांन मध्ये आमने सामने येणार आहेत. या मालिकेत टीम इंडिया एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. कारण गौतम गंभीरच्या रूपाने संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवची टी20 मध्ये टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार आहेत. गौतम गंभीर नवा मुख्य प्रशिक्षक बनल्याने विराट कोहली नाराज असल्याचे याआधी सर्वांना वाटत होते, पण आता वनडेमध्ये विराट कोहलीचे नाव आल्यानंतर ही शंका संपली आहे. शिवाय गाैतम गंभीरची हेड कोच म्हणून ही पहिलीच मालिका असल्याने विराट कोहलीने देखील या दाैऱ्यासाठी उपल्बध असल्याचे सांगितले होते. यासोबतच विराट कोहलीने गौतम गंभीरसोबतचा जुना वाद संपुष्टात आणत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) स्पष्ट संदेशही लिहिला आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, कोहलीने बीसीसीआयला आश्वासन दिले आहे की त्याच्या आणि गंभीरमधील मागील मतभेदांचा संघातील त्यांच्या व्यावसायिक संबंधांवर परिणाम होणार नाही. भारतीय संघाच्या हितासाठी काम करणे हा दोघांचाही उद्देश असून याबाबत काळजी करण्याची गरज नाही.
श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
टी 20 मालिका: या मालिकेतील पहिला टी20 सामना 27 जुलै रोजी खेळवला जाईल. दुसरा सामना 28 जुलैला तर तिसरा टी20 सामना 30 जुलैला खेळवला जाईल.
एकदिवसीय मालिका: या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्ट रोजी, दुसरा एकदिवसीय सामना 4 ऑगस्ट रोजी आणि तिसरा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीर हेड कोच बनताच केकेआरच्या खेळाडूंची चांदी, दोघांची थेट भारतीय संघात एंट्री
आशिया चषक 2024 : भारतानं पाकिस्तानला सहज धूळ चारली, गोलंदाजांची चमकदार कामगिरी
“त्याचं शुबमन गिलसारखं नशीब कुठे…”, माजी मुख्य निवडकर्त्याचे भारतीय संघ व्यवस्थापनावर ताशेरे