जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. मात्र, सर्वात चर्चेत राहिला शुबमन गिल. यामागील कारण असे की, भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना गिल, स्कॉट बोलँड याच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कॅमरून ग्रीन याच्या हातून झेलबाद झाला. हा झेल वादग्रस्त ठरला. गिलचा झेल पाहून असे वाटते होते की, झेल घेताना चेंडू जमिनीला स्पर्श करत आहे. मात्र, तिसऱ्या पंचांनी गिलला बाद घोषित केले होते. यानंतर भारतीय फलंदाजाने आपल्या विकेटची प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली. आता गिलची ही प्रतिक्रिया त्याच्याच अंगलट आली आहे.
आयसीसीने ठोठावला दंड
आयसीसीने शुबमन गिल (Shubman Gill) याला सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावला. ही घटना डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्याच्या चौथ्या दिवशी घडली. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. यावेळी झेलबाद झाल्यानंतर गिलने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आपल्या झेलाबद्दलची प्रतिक्रिया दिली होती.
????????????????♂️ pic.twitter.com/pOnHYfgb6L
— Shubman Gill (@ShubmanGill) June 10, 2023
आयसीसीने सांगितले की, शुबमन गिल याला कसोटीच्या चौथ्या दिवशी बाद दिल्याच्या निर्णयाची टीका केल्याप्रकरणी शिक्षेचा सामना करावा लागला. गिलने कलम 2.7चे उल्लंगन केले, जे आंतरराष्ट्रीय सामन्यात होणाऱ्या घटनेशी संबंधित सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणीशी संबंधित आहे. यामुळे गिलला सामना शुल्काच्या 15 टक्के दंड बसला.
दोन्ही डावात स्कॉट बोलँडची शिकार
खरं तर, शुबमन गिल हा अंतिम सामन्यातील दोन्ही डावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड (Scott Boland) याच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या डावात बोलँडने गिलला त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात बोलँडने गिलला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कॅमरून ग्रीन (Cameron Green) याच्या हातून झेलबाद केले.
???? JUST IN: India, Australia and star opener sanctioned by the ICC.
Details ⬇️https://t.co/n1AVCUeVTm
— ICC (@ICC) June 12, 2023
विशेष म्हणजे, गिल दोन्ही डावात फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात 2 चौकारांसह 13 धावा केल्या. तसेच, दुसऱ्या डावातही त्याने 2 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या होत्या. (team india opener shubman gill fined 15 percent of their match fees world test championship final 2023)
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबाने थट्टा मांडली! आधी WTC Final गमावली, नंतर टीम इंडियाला बसला 115 टक्के दंडाचा फटका
स्मिथच्या ‘त्या’ कॅचने तोडले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मान खाली घालून तंबूत परतला विराट- Video