भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका 12 जुलै रोजी सुरू होणार आहे. भारतीय संघ 4 जुलै रोजी सरावाला सुरूवात करणार आहे. सर्व खेळाडूंना वेस्ट इंडीजमध्ये पोहोचल्यानंतर दोन दिवसांची विश्रांती मिळाली आहे. या मोकळ्या वेळात खेळाडूंनी समुद्रकिनारी वॉलिबॉलचा आनंद घेतला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात दोन वेगवेगळे गट पडल्याचे पाहायला मिळाले. समुद्रकिनारी वॉलीबॉल सामना खेळताना हे दोन गट एकमेकांविरुद्ध दिसले. विराट कोहलीसह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) देखील या सामन्याचा आनंद घेताना दिसला. एका बाजुला मोहम्मद सिराज आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासह इतर काही खेळाडू दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली (Virat Kohli), राहुल द्रविड यांच्यासह खाही खेलाडू दिसत आहेत. अश्विन आणि शार्दुल ठाकूर हेदेखील व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहेत, तर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन या सामन्याला मोबाईलमध्ये कैद करताना दिसतो. बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
𝗧𝗼𝘂𝗰𝗵𝗱𝗼𝘄𝗻 𝗖𝗮𝗿𝗶𝗯𝗯𝗲𝗮𝗻! 📍
Ishan Kishan takes over the camera to shoot #TeamIndia's beach volleyball session in Barbados 🎥😎
How did Ishan – the cameraman – do behind the lens 🤔#WIvIND | @ishankishan51 pic.twitter.com/ZZ6SoL93dF
— BCCI (@BCCI) July 3, 2023
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
(Team India playing beach volleyball in the West Indies)
महत्वाच्या बातम्या –
Ashes 2023 । प्रमुख खेळाडूचा पत्ता कट! शेवटच्या तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियान संघाची घोषणा
Ashes 2023 । हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा! दोन प्रमुख खेळाडू संघातून आउट