---Advertisement---

दुसऱ्या टी२० सामन्यात अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन, ‘हा’ खेळाडू ठरू शकतो ‘ट्रम्प कार्ड’

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 4:06 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना उद्या (६ डिसेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव करत विजय प्रारंभ केला आहे. भारताने विजय मिळवला असला, तरी भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी विराट कोहली एक मजबूत संघ मैदानात उतरवू शकतो.

रविवारी होणाऱ्या सामन्यात हे संभावित अकरा खेळाडू भारतासाठी सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उतरताना दिसतील.

पाच तज्ञ फलंदाज असतील संघात सामील

भारतीय संघ सिडनी टी२० सामन्यात ५ तज्ज्ञ फलंदाजांसह खेळू शकतो. सलामीची जबाबदारी पुन्हा एकदा शिखर धवन आणि उपकर्णधार केएल राहुल निभावताना दिसतील. राहुलने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. कर्णधार विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर उतरेल. पहिल्या सामन्यात फॉर्ममध्ये दिसलेल्या संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात येईल. मनीष पांडे हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणे देखील निश्चित आहे. पांडे संघात असताना भारतीय संघाने सलग २० टी२० सामने जिंकले आहेत.

पंड्या-सुंदर निभावतील अष्टपैलूंची भूमिका

पहिल्या सामन्याप्रमाणेच हार्दिक पंड्या व वॉशिंग्टन सुंदर यांचे दुसऱ्या सामन्यात खेळणे निश्चित आहे. पहिल्याच सामन्यात फलंदाजीत अमूल्य योगदान देणारा रवींद्र जडेजा उर्वरित मालिकेतून बाहेर गेला आहे. त्यामुळे पंड्या व सुंदर त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी असेल. सुंदरने पहिल्या सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करताना आपल्या चार षटकात अवघ्या १६ धावा दिल्या होत्या, तर हार्दिक वनडे मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला दिसून आला होता.

भारतीय गोलंदाजी आक्रमण आहे सुदृढ

भारतीय संघ गोलंदाजी आक्रमणात एक बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात खेळलेल्या मोहम्मद शमीऐवजी जसप्रीत बुमराहला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे जसप्रीत बुमराह, दीपक चाहर व पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करणारा टी नटराजन हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. पहिल्या सामन्यात जडेजाचा कन्कशन सब्टिट्यूट म्हणून आलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे तीन गडी बाद करत सामना भारताच्या पारड्यात टाकला होता. चहल पुन्हा एकदा भारताचा ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो.

भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन संघ-

शिखर धवन, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), संजू सॅमसन, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, युझवेंद्र चहल, टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह

महत्त्वाच्या बातम्या-

एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट

“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”

मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट

ट्रेंडिंग लेख-

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---