---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाने सुरू केली ‘ही’ प्रक्रिया; आजपासून झाली सुरुवात

On: मंगळवार, मे 25, 2021 7:15 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर सर्व क्रिकेटप्रेमींना पुन्हा भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याचे वेध लागले आहेत. भारतीय संघ आपला नव्या हंगामाचा पहिला दौरा म्हणून इंग्लंडला लवकरच रवाना होणार आहे. भारतीय महिला संघ देखील इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार असल्याने इंग्लंडसाठी उड्डान भरेल. तत्पूर्वी, या दोन्ही संघांचा विलगीकरण कालावधी (क्वारंटाईन) मुंबई येथे सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या ठिकाणी थांबला आहे भारतीय संघ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय पुरुष संघ तसेच तिन्ही प्रकारच्या मालिकांसाठी भारतीय महिला संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडला जाण्याआधी दोन्ही संघांनी मुंबई येथील हॉटेल ग्रँड हयात येथे मंगळवार (२५ जून) विलगीकरणास सुरुवात केली आहे. हे ठिकाण मुंबई एअरपोर्टपासून जवळ असल्याने या ठिकाणाची निवड केली गेली असल्याचे सांगण्यात आले.

खेळाडूंच्या होणार इतक्या चाचण्या
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय महिला व पुरुष संघाला तसेच या संघासोबत जाणाऱ्या प्रशिक्षक व कर्मचारी वर्गाला तीन आरटी-पीसीआर चाचण्या नकारात्मक आल्यानंतरच इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे. आयपीएल दरम्यान कोरोनाबाधित आढळलेले वृद्धिमान साहा व प्रसिद्ध कृष्णा हे या आजारातून बरे होत संघात सामील झाले आहेत. मुंबईतच राहणारे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, अनुभवी रोहित शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कर्णधार विराट कोहली हे देखील या बायो-बबलमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

दोन्ही संघांचा असा असेल दौरा
भारतीय पुरुष संघ इंग्लंडमध्ये सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला लय भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. दुसरीकडे, भारतीय महिला संघ एक कसोटी व प्रत्येकी ३ वनडे व ३ टी२० सामने खेळल्यानंतर मायदेशी परतेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

हे भारी आहे! ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये आता सचिन, विराटच्या नावाने असणार घराचा पत्ता

“भारताविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने कर्णधाराचा ओरडा खावा लागला होता”

तेलही गेले अन् तूपही! पोलिस कोठडीत असलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारवर अजून एक संकट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---