---Advertisement---

जडेजाचा ‘रिकव्हरी फेज’ सुरू, उभा राहण्यासाठीही घ्याला लागतोय काठीचा आधार

On: गुरूवार, सप्टेंबर 15, 2022 9:43 AM
ravindra jadeja
---Advertisement---

भारताचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया चषक 2022 च्या मध्यातून बाहेर पडला. आगामी टी-20  विश्वचषकात देखील तो खेळणार नाहीये. काही दिवसांपूर्वी गुडघ्याला झालेल्या गंभीर दुखपतीमुळे त्याची शस्त्रक्रिया झाली होती. आता या शस्त्रक्रियेनंतर जडेजाने सोशल मीडिया खात्यावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोवरून जडेजा दुखापतीतून सावरत असल्याचे स्पष्ट होते. 

भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये तो काठीच्या सहारे उभा राहिल्याचे दिसते. हा फोटो जडेजाच्या राजकोटमधील घरचा आहे, असा अंदाज बांधला जात आहे. जडेजाच्या पायाला प्लास्टर केल्याचे दिसत आहे. पोटोच्या कॅप्शनमध्ये जडेजाने लिहिले आहे की, “योग्य वेळी एक पाऊल.” चाहते जडेजाला अशा अवस्थेत पाहून चिंता व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जडेजाची ही शस्त्रक्रिया विदेशात झाली असून आता तो मायदेशात परतला आहे. आशिया चषकादरम्यान त्याच्या गुडघ्याला दाखापत झाल्याचे समोर आले होते. आशिया चषकातील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये तो खेळाला,  पण तिसऱ्या सामन्यात त्याला सहभागी होता आले नाही. माध्यांमध्ये अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, जडेजाला बीसीसीआयच्या नियमांच्या बाहेरली असा कोणतातरी सराव करायला सांगितला गेला होता, ज्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. आता त्याची अनुपस्थिती भारतीय संघासाठी टी-20 विश्वचषकात नक्कीच महागात पडू शकते. जडेजा जेव्हा दुखापतीतून सावरेल आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत स्वतःची फिटनेस सिद्ध करेल, तेव्हा भारतीय संघात पुनरागमन करू शकले. त्याच्या पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित होऊ शकली नाहीये.

https://www.instagram.com/p/CifMwK6sc8e/?utm_source=ig_web_copy_link

जडेजाच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत 60 कसोटी, 171 एकदिवसीय आणि 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने नावावर 3 शतक आणि 17 अर्धशतकांच्या मदतीने 2523 धावा केल्या आहेत, तसेच 242 विकेट्स देखील घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 13 अर्धशतकांच्या मदतीने 2447 धावा आणि सोबतच 189 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने 51 विकेट्स घेतल्या आहेत आणि 457 धावाही केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विनेशची आणखी एक विशेष कामगिरी! जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकले विक्रमी ब्रॉंझ
जय शाह होणार नवे बीसीसीआय अध्यक्ष?
दिग्गजांचे द्वंद्व हुकले! पावसाच्या व्यत्ययाने इंडिया लिजेंड्स विरूद्ध वेस्ट इंडिज लिजेंड्स सामना रद्द ‌  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---