---Advertisement---

श्रीलंका मोहिमेवरून ‘धवनसेने’ची मायदेशी रवानगी, कृणालसह तिघे श्रीलंकेतच; पण सूर्या-पृथ्वीचं काय?

On: शनिवार, जुलै 31, 2021 6:36 AM
---Advertisement---

श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका गुरुवारी (२९ जुलै) संपली. श्रीलंकेने ही मालिका २-१ ने जिंकली. याचबरोबर भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संपला. शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने वनडे मालिका आपल्या नावे केली होती. त्यानंतर, शुक्रवारी (३० जुलै) भारतीय संघाचा ताफा बेंगलोर येथे परतला. त्यानंतर भारतीय खेळाडू आपआपल्या शहराकडे रवाना होणार आहेत.

भारतीय संघ पोहोचला बेंगलोर येथे
श्रीलंका दौरा संपवून भारतीय संघ शुक्रवारी उशीरा बेंगलोर येथे पोहोचला. कोरोनाबाधित असलेले कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल व कृष्णप्पा गौतम हे उर्वरित संघासह भारतात आले नाहीत. बेंगलोर येथे पोहोचलेले खेळाडू आरटी-पीसीआर टेस्ट नकारात्मक आल्यानंतर आपापल्या शहराकडे रवाना होतील. जून महिन्याच्या मध्यापासून हे सर्व खेळाडू बायो-बबलचा भाग होते‌. त्यामुळे, आयपीएलपूर्वी हे सर्वजण ताजेतवाणे होऊन परततील.

कोरोनाबाधित खेळाडू राहणार श्रीलंकेत
कृणालपाठोपाठ चहल व गौतम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हे तिघे सध्या भारतात परतणार नाहीत. श्रीलंका कोविड प्रोटोकॉलनुसार या तिघांना पूर्णपणे बरे होईपर्यंत क्वारंटाईन राहावे लागेल. भारतात येण्यापूर्वी या तिघांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येईल. ती नकारात्मक आल्यानंतरच त्यांना भारतात जाण्याची परवानगी दिली जाईल.

सूर्यकुमार व पृथ्वी शॉ जाणार इंग्लंडला
कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्याने पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास विलंब लागू शकतो. ते सध्या कोलंबोमध्ये असून शनिवारी (३१ जुलै) इंग्लंडला जाण्यासाठी उड्डाण भरतील. इंग्लंडमध्ये जखमी झालेल्या वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान यांचे बदली खेळाडू म्हणून त्यांना संधी मिळाली आहे. इंग्लंडमध्ये गेल्यावरही ते दोघे क्वारंटाईन राहतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथे सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बाय बाय डरहॅम! पहिल्या कसोटीसाठी नॉटिंघमला रवाना झाली विराटसेना, ‘या’ मैदानावर करणार सराव

व्वा रे पठ्ठ्या! मिचेल स्टार्कच्या भावाने टोकियो ऑलिंपिकमध्ये दाखवला दम, मिळवले फायनलचे तिकीट

इंग्लंडचा अष्टपैलू स्टोक्सची भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार, ‘हा’ खेळाडू घेणार जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---