---Advertisement---

Video: ‘टीम इंडिया’ पोहोचली दक्षिण आफ्रिकेत; श्रेयसने धरला ताल तर विराट…

INDIA TOUR OF SOUTH AFRICA
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) या वर्षाअखेरीस सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ नुकताच दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या दहशतीखाली हा दौरा पार पडणार आहे. भारतीय संघाने मुंबई ते जोहान्सबर्ग अशा केलेल्या प्रवासाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यामध्ये सर्व खेळाडू अगदी मजामस्ती करताना दिसत आहेत.

भारतीय संघ पोहोचला जोहान्सबर्ग येथे
भारतीय संघाने गुरुवारी (१६ डिसेंबर) रोजी मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेकडे प्रयाण केले. भारतीय संघ रात्री उशिरा जोहान्सबर्ग येथे उतरला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहेत. कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli), ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे अनुभवी खेळाडू आपल्या सहकार्‍यांशी बातचीत करताना दिसले.

 

जोहान्सबर्ग येथे उतरल्यानंतर भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेतील पारंपारिक संगीताच्या तालावर स्वागत करण्यात आले. भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने त्यावेळी ताल धरला. (Shreyas Iyer) ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व खेळाडू मास्क व फेस शील्ड लावलेले दिसून आले. तसेच हॉटेल कर्मचारी देखील खेळाडूंपासून काही अंतरावर उभे होते. भारताच्या या दौऱ्याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होईल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन

वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन

महत्त्वाच्या बातम्या-

डी कॉक होणार बाबा! कसोटी मालिकेपूर्वी पत्नीसह घेतोय सुट्ट्यांचा आनंद

विराट खोटे बोलतोय का? बीसीसीआय म्हणतेय, “त्या निर्णयाचे आठ साक्षीदार”

आता विराटवर होणार ‘दादागिरी’! स्वतः बीसीसीआय अध्यक्षांनी दिले संकेत

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---