आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 च्या आधी अमेरिकेला रवाना झालेल्या भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कला पोहोचली. कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा यांसह भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
बीसीसीआयनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी अमेरिकेला पोहोचणाऱ्या खेळाडूंची क्लिप शेअर केली. व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू न्यूयॉर्कमधील विमानतळावरून बाहेर पडताना आणि टीम बसमध्ये चढताना दिसत आहेत.
✈️ Touchdown New York! 🇺🇸👋#TeamIndia 🇮🇳 have arrived for the #T20WorldCup 😎 pic.twitter.com/3aBla48S6T
— BCCI (@BCCI) May 27, 2024
क्रिकबझने दिलेल्या बातमीनुसार, हार्दिक पांड्या रविवारी न्यूयॉर्कला पोहोचला आहे. तो लवकरच टीम इंडियासोबत शामिल होणार आहे. टीम इंडीया आपला पहिला सराव सामना 1 जून रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. भारताच्या टी 20 विश्वचषकाची मोहीम 5 जूनपासून आयर्लंडविरुद्ध न्यूयॉर्कमधील नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना रंगणार आहे.
भारतीय संघ 2007 साली झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये विजेतेपद पटकावले होते. भाारतीय संघ 2013 मध्ये शेवटच्या वेळी आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन ठरला होता.टीम इंडीयास मागील 10 वर्षांत कोणताही आयसीसी ट्राॅफी जिंकण्यात यश मिळालं नाही. यंदाच्या टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्मा बिग्रेड ट्राॅफी जिंकून इतिहास रचणार का? हे पाहंण महत्वाच ठरणार आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार ), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार) यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
राखिव खेळाडू- शुबमन गिल, रिंकु सिंग, खलिल अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
शाहरुख खाननं केलं बीसीसीआयला ट्रोल, ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर दिलं ‘फ्लाइंग किस’; पाहा VIDEOकेवळ गंभीरमुळे चॅम्पियन बनला नाही केकेआर, पडद्यामागे राहून ‘या’ व्यक्तीनं घडवलाय चमत्कार!
काय सांगता! ट्राॅफी जिंकली कोलकातानं पण नारे लागले चेन्नईचे… किंग खानचा मैदानावरील व्हिडीओ व्हायरल