झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ वनडे मालिकेसाठी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हरारेला पोहोचली आहे. केएल राहुल दुखापती आणि कोरोनामधून बरा होऊन संघात पुनरागमन करत आहे. आशिया चषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची त्याच्याकडे ही शेवटची संधी असेल. क्रिकेट झिम्बाब्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भारतीय क्रिकेट संघ हरारेला पोहोचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिले होते. “ते इथे आले आहेत, टीम इंडिया ३ वनडे खेळण्यासाठी हरारे येथे पोहोचली आहे. हरारे येथील स्पोर्ट्स क्लब मैदानावर १८, २० आणि २२ ऑगस्ट रोजी तिन्ही वनडे सामने होतील.” क्रिकेट झिम्बाब्वेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडू हरारे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. याआधी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचे झिम्बाब्वेला रवाना झाल्याचे काही फोटो शेअर केले होते.
They are here now . . . ???????? have just landed in Harare ahead of the three-match ODI series against ???????? scheduled for 18, 20 and 22 August at Harare Sports Club #WelcomeIndia | #ZIMvIND | #VisitZimbabwe pic.twitter.com/lViHCYPSPL
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) August 13, 2022
शिखर धवनला पहिल्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते. पण, दौरा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने केएल राहुलला तंदुरुस्त असल्याने संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेमुळे केएल राहुल संघाबाहेर होता. या दुखापतीतून सावरताना त्याला कोरोना झाला. या कारणामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळू शकला नव्हता. मात्र आता झिम्बाब्वेविरुद्ध केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करत आहे.
लक्ष्मण संघासोबत प्रशिक्षक म्हणून आला आहे
विशेष म्हणजे २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये भारताला सहभागी व्हायचे आहे. याच कारणामुळे युवा खेळाडूंनी सजलेला संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू झिम्बाब्वेला गेलेले नाहीत. त्याचवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही या मालिकेसाठी संघासोबत नाही. त्यांच्या जागी एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षक पदाची जबाबदारी आली आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेने नुकतेच घरच्या वनडे आणि टी-२० मालिकेत बांगलादेशचा पराभव केला. अशा स्थितीत झिम्बाब्वेचा हा दौरा टीम इंडियासाठी युवा खेळाडूंसाठी सोपा असणार नाही. त्यामुळे भारतीय संघाला त्यांच्या बेंच स्ट्रेंथची ताकद या दौऱ्यातून समजेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022: रोहित करणार धोनीची बरोबरी! बाबरकडे आफ्रिदी आणि इंजमामला मागे टाकण्याची संधी
‘वाघ खूप आहेत, पण द्रविड एकच!’ आत्मचरित्रात रॉस टेलरने सांगितला भन्नाट किस्सा
Asia Cup 2022 | भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू आहे कारण






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा