न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात उद्या(26 जानेवारी) दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. त्यामुळे भारतीय संघ माऊंट मॉनगनुई येथे दाखल झाला आहे.
यावेळी भारतीय संघाचे शुक्रवारी(25 जानेवारी) माओरी कम्यूनिटीने बे ओव्हल मैदानावर पारंपरिक पद्धतीने स्वागत केले आहे. या स्वागतावेळी त्यांनी डान्स आणि गाणी सादर केली तसेच होन्गी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीने भारतीय खेळाडूंच्या आणि सपोर्ट स्टाफच्या नाकाचा स्पर्शही केला.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘भारतीय संघाचे बे ओव्हल मैदानावर पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले आहे. ज्याची भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्याआधी मजा घेतली आहे.’
https://twitter.com/BCCI/status/1088740869929238528
भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने 1-0 असा आघाडीवर आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकून भारतीय संघाला आघाडी वाढवण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना माऊंट मॉनगनुई येथेच होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
–हार्दिक पंड्या होणार टीम इंडियात सामील, तर राहुललाही मिळाले या संघात स्थान
–ज्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यांनीच केले किंग कोहलीचे कौतुक






