झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (१८ ऑगस्ट) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यजमान संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली. १९० धावांचा पाठलाग करताना शिखर धवन व शुबमन गिल यांनी नाबाद अर्धशतके ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्ध सर्वाधिक सलग वनडे विजय मिळवण्याचा विक्रम केला.
हरारे येथे खेळल्या गेलेल्या या पहिल्या सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्ध सर्वाधिक सलग वनडे सामने विजयाचा विक्रम केला. झिम्बाब्वेविरूद्ध भारताने हा सलग १३ वा वनडे विजय साजरा केला. २०१३ पासून झिम्बाब्वे भारताला वनडेत पराभूत करू शकला नाही. पाकिस्ताननेही सलग १२ वनडेत झिम्बाब्वेला पराभूत केले होते. कोणत्याही संघाविरुद्ध भारताची ही वनडेतील सर्वाधिक विजयाची साखळी आहे. यापूर्वी भारतीय संघाने १९८८ ते २००४ या काळात सलग १२ सामन्यात बांगलादेशला पराभूत केले होते.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या दीपक चहर, अक्षर पटेल व प्रसिद्ध कृष्णा त्यांनी प्रत्येकी तीन बळी घेत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. इवान्स व नवागारा यांनी नवव्या गड्यासाठी ५६ धावा जोडून संघाला १८९ पर्यंत नेले. प्रत्युत्तर धवन व गिल यांना बाद करू शकणारा चेंडू झिम्बाब्वेचा एकही गोलंदाज टाकू शकला नाही. अखेरीस भारताने ३०.५ षटकात विजय साकारला. दीपक चहर याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटचा ‘राजा बाबू’! एका पायावर मारले तब्बल ७० षटकार; आता सरकारकडून आहे अपेक्षा
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श