---Advertisement---

टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 3:33 PM
Rohit-Sharma-Team-India
---Advertisement---

आगामी टी20 विश्वचषक 2022 चे बिगूल वाजले असून 16 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना 23 नोव्हेंबरला होईल. तत्पूर्वी भारतीय संघ मायदेशात 2 बलाढ्य संघांचा आमना करणार आहे. त्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांद्वारे उभय संघ टी20 विश्वचषकाची तयारी करतील.

सर्वप्रथम तर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्हीही संघ 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत. 20 सप्टेंबरपासून या मालिकेची सुरुवात होणार आहे. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आएस बिंद्रा स्टेडियमवर टी20 मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर 23 तारखेला नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर मालिकेतील दुसरा टी20 सामना रंगणार आहे. तर तिसरा व शेवटचा टी20 सामना 25 सप्टेंबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. हे सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकांचे वेळापत्रक-
पहिला टी20 सामना – 20 सप्टेंबर, मोहाली (संध्याकाळी 7.30)
दुसरा टी20 सामना – 23 सप्टेंबर, नागपूर (संध्याकाळी 7.30)
तिसरा टी20 सामना – 25 सप्टेंबर, हैदराबाद (संध्याकाळी 7.30)

ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघ 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहेत. 28 सप्टेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तर 11 ऑक्टोबरला हा दौरा संपेल. 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला टी20 सामना रंगेल. मग 2 ऑक्टोबरला गुवाहाटी आणि 4 ऑक्टोबरला इंदोर येथे अनुक्रमे दुसरा व तिसरा टी20 सामना होईल. हे सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता होतील.

टी20 मालिकेनंतर 3 सामन्यांची वनडे मालिका होईल. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनऊमध्ये होणार आहे. 9 ऑक्टोबरला रांची व 11 ऑक्टोबरला दिल्लीत अनुक्रमे दुसरा व तिसरा वनडे सामना होईल. वनडे मालिकेतील सर्व सामने दुपारी 1.30 ला सुरू होतील.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकांचे वेळापत्रक-
पहिला टी20 सामना- 28 सप्टेंबर, तिरुवनंतपुरम (संध्याकाळी 7.30)
दुसरा टी20 सामना – 02 ऑक्टोबर, गुवाहाटी (संध्याकाळी 7.30)
तिसरा टी20 सामना – 4 ऑक्टोबर, इंदोर (संध्याकाळी 7.30)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकांचे वेळापत्रक-
पहिला वनडे सामना- 06 ऑक्टोबर, लखनऊ (दुपारी 1.30)
दुसरा वनडे सामना- 09 ऑक्टोबर, रांची (दुपारी 1.30)
तिसरा वनडे सामना- 11 ऑक्टोबर, दिल्ली (दुपारी 1.30)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘टी20 स्पेशालिस्ट’ सूर्याची वर्ल्डकपसाठी खास तयारी! स्वत:च सांगितले, कशी आहे स्पेशल ट्रेनिंग?
भारताचा कर्णधार बनल्यानंतर संजूने दिली पहिली प्रतिक्रिया, राहुल-पंतबद्दलही लक्षवेधी भाष्य
रोहित शर्माच नाही तर ‘हा’ खेळाडूही खेळणार आठवा टी20 विश्वचषक, कॅप्टन आहे संघाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---