भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या निराशेचे वातावरण आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ आता महिनाभर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. मात्र त्यानंतर वर्ष संपेपर्यंत भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अत्यंत व्यस्त असणार आहे.
भारतीय संघ आता जुलै-ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाईल. तिथे दोन कसोटी, तीन वनडे व तीन टी20 सामने भारतीय संघ खेळणार आहे. हा दौरा 12 जुलैपासून सुरू होईल. यानंतर सप्टेंबर महिन्यात बहुप्रतिक्षित आशिया चषक नियोजित असून, तो पाकिस्तान व श्रीलंकेत खेळला जाणार आहे.
यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. त्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान देखील वनडे मालिका खेळली जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केली गेली नाही.
या सर्व मालिकांनंतर 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे विश्वचषकाचा थरार रंगेल. विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघाला दोन सराव सामने देखील खेळायला मिळणार आहेत. विश्वचषकाचे समाप्ती नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. विश्वचषक समाप्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ भारतातच राहून भारताविरुद्ध पाच सामन्यांची मोठी टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 वनडे व 3 टी20 सामने खेळेल.
अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर सध्या तरी आगामी वनडे विश्वचषक जिंकण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने रोहित सेना आता विचार करू शकते.
(Team India Schedule Till December End 2023 ODI World Cup Is Most important)
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’
WTC फायनलचा पराभव विराटच्या जिव्हारी, एक शब्दही न बोलण्याचा घेतला निर्णय; स्टोरी पाहून व्हाल भावूक