इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ५६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. ही मालिका आता १-१ च्या फरकाने बरोबरीत आहे.
त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु, ओव्हल कसोटी सामन्यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय संघाला राहुल द्रविड सारखी कामगिरी करावी लागणार आहे.
ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत एकूण १२ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान इंग्लंड संघाने ४ तर भारतीय संघाने एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित ७ सामने हे अनिर्णीत राहिले आहेत. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना १९३६ मध्ये पार पडला होता. या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवला होता.
या मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये अखेरचा कसोटी सामना २०१८ मध्ये झाला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने ११८ धावांनी विजय मिळवला होता. पण, या सामन्यातील चौथ्या डावात केएल राहुलने १४९ आणि रिषभ पंतने ११४ धावांची खेळी केली होती. असे असले तरी, भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
राहुल द्रविडने झळकावले होते दुहेरी शतक
राहुल द्रविडने या मैदानावर ३ कसोटी सामन्यात ११० च्या सरासरीने ४४३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २ शतक आणि १ अर्धशतक झळकावले आहे. २००२ मध्ये ओव्हलच्या मैदानावर राहुल द्रविडने २१७ धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे सामना अनिर्णीत राहिला होता. द्रविडसह सचिनने ५४ आणि सौरव गांगुलीने ५१ धावांचे योगदान दिले होते. ज्यामुळे भारतीय संघाला ५१८ धावांचा डोंगर उभारता आला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता (Team india should learn from rahul dravid if they want to win oval test)
अनिल कुंबळेने झळकावले होते शतक
या मैदानावर अनिल कुंबळे यांनी देखील शतक झळकावले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील एकमात्र शतक ओव्हलच्या मैदानावर झळकावले होते. त्यांनी २००७ मध्ये १०७ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ६६४ धावा करण्यात यश आले होते. या डावात दिनेश कार्तिकने ९१, द्रविडने ५५, सचिनने ८१, वीवीएस लक्ष्मणने ५१ आणि एमएस धोनीने ९२ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाच्या ‘मिस्ट्री स्पिनर’ने केले आहे ‘या’ चित्रपटात काम
सात प्रकारे गोलंदाजी करणारा ‘आर्किटेक्ट’; वाचा गोलंदाज वरुणची ‘चक्रवर्ती’ कहाणी
चौथ्या कसोटीसाठी ‘हा’ खेळाडू करू शकतो टीम इंडियात पुनरागमन, कोहलीचे संघबदलाचे संकेत






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर