दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली पाच सामन्यांची टी-२० मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा बुधवारी (दि. १५ जून) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्याकडून करण्यात आली. बीसीसीआयने घोषीत केलेल्या या १७ सदस्यीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आले आहे. ( Team India Squad For T20I Series against Ireland Announced )
India Squad
Hardik Pandya (C), Bhuvneshwar Kumar (vc), Ishan Kishan, Ruturaj Gaikwad, Sanju Samson, Suryakumar Yadav, Venkatesh Iyer, Deepak Hooda, Rahul Tripathi, Dinesh Karthik (wk), Yuzvendra Chahal, Axar Patel, R Bishnoi, Harshal Patel, Avesh Khan, Arshdeep Singh, Umran Malik— BCCI (@BCCI) June 15, 2022
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
व्हीव्हीएस लक्ष्मणवर प्रशिक्षक पदाची जबाबदारी…
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर भारताच्या आयर्लंड दौऱ्याच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर भारताचा संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे २६ आणि २८ जून रोजी आयर्लंड विरुद्ध दोन टी २० सामने होतील. नेमके याचवेळी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सहकारी टीम इंडियाच्या कसोटी संघासह इंग्लंडला रवाना होणार आहेत.
( Team India Squad For T20I Series against Ireland )
अधिक वाचा :
आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत बीसीसीआय ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?
इंग्लंड दौऱ्यात भारतीय कर्णधार खेळणार का?
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?






