जगातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगचा यंदाचा १५वा हंगाम खेळला जात आहे. या लीगमध्ये जगभरातील जबरदस्त खेळाडू आपला जलवा दाखवत असतात. या खेळाडूंवर चाहत्यांपासून ते क्रिकेट जाणकारांपर्यंत सर्वांच्या नजरा असतात. काही खेळाडू असेही असतात, जे खेळासोबतच आपल्या विधानानेही चर्चेत येतात. असाच एक भारतीय खेळाडू चर्चेत आला आहे. यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत, तो खेळाडू इतर कोणी नसून पंजाब किंग्स संघाचा अष्टपैलू ऋषी धवन आहे. धवनने निवडकर्त्यांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
कुणीही लक्ष दिले नाही
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघासाठी तुफान कामगिरी करणाऱ्या ऋषी धवन (Rishi Dhawan) याने त्याच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. धवन म्हणाला की, अनेक वर्षांपासून त्याच्या कामगिरीवर कुणीही लक्ष देत नव्हते. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “४ वर्षांपर्यंत आयपीएलमध्ये खेळून आणि भारताकडून पदार्पण केल्यानंतर संघातून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर पुढील ५ वर्षे माझी निवड करण्यात आली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये माझ्या प्रदर्शनावर कोणीही लक्ष देत नव्हते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
चांगल्या प्रदर्शनानंतरही मिळाली नाही संधी
याव्यतिरिक्त धवन असेही म्हणाला की, तो चांगले प्रदर्शन करत होता. मात्र, त्याच्यावर कोणीही लक्ष दिले नाही. धवन पुढे बोलताना म्हणाला की, “हे खूप वाईट होते की, मला चांगल्या प्रदर्शनानंतरही संधी मिळाल्या नव्हत्या. माझ्यात खूप दु:ख साचले होते आणि ते मी शब्दात मांडू शकत नाही. मला माहितीये की, जेव्हा मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा मी तसे प्रदर्शन करू शकलो नाही, ज्याची माझ्याकडून अपेक्षा होती. मात्र, मला विश्वास होता की, मी चांगली कामगिरी करू शकतो.”
ऋषी धवनने वरील प्रतिक्रिया इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे.
तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलमध्ये मिळाली संधी
पंजाब किंग्स संघाने अष्टपैलू ऋषी धवनला या हंगामात आपल्या संघात सामील केले आहे. धवन तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलमध्ये उतरला आहे. धवनला पंजाब संघाने मेगा लिलावात ५५ लाख रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते. धवन त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसोबतच फलंदाजीसाठीही ओळखला जातो. देशांतर्गत क्रिकेटनंतर तो खूपच कमालीच्या फॉर्ममध्ये आहे, यानंतर पंजाब किंग्स संघाने त्याच्यावर बोली लावली होती.
हिमाचल संघाला बनवले होते चॅम्पियन
धवनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल संघाचे नेतृत्व केले होते. या संघाला विजेतेपद मिळवून देण्यातही तो यशस्वी ठरला होता. धवनने यादरम्यान आपल्या फलंदाजीची कमाल दाखवून दिली होती. यावेळी त्याने ८ सामन्यात ४५८ धावा चोपल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजीतही झक्कास कामगिरी केली होती. त्याने या ८ सामन्यात १७ विकेट्स चटकावल्या होत्या. धवनमुळेच हिमाचल संघाला पहिल्यांदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजेतेपद मिळवता आले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून
शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’