भारतीय संघ 5 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. 5 जून दिवशी टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाचे कौतुक केले आहे. टीम इंडियाने शेवटचे 2013 मध्ये आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला होता. टीम इंडीया 11 वर्षांपासून आयसीसी विजेतेपद शोधत आहे.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, संघाने 11 वर्षांपासून ट्रॉफी जिंकली नसली तरी आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. रोहित शर्मा बिग्रेड ट्रॉफीबाबत फारसा विचार करत नसल्याचेही त्याने सांगितले. सध्या संघाचे लक्ष बाद फेरी (knock out) गाठण्यावर आहे
टीम इंडीयाचे हेड कोच राहुल द्रविड पुढे म्हणाले,
“मला वाटते की आम्ही विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धांमध्ये आम्ही सातत्य राखले आहे. भारतीय संघाने 2022 मध्ये उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले होते. विश्व कसोटी स्पर्धेच्या संपूर्ण चक्रात संघाने चांगला खेळ केला. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी आम्हाला पुन्हा अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळाली आहे. आम्ही मोठ्या स्पर्धेत दर्जेदार क्रिकेट खेळलो आहे. आम्ही नॉकआऊट सामन्यांमध्ये कदाचित चांगली कामगिरी केली नाही. आशा आहे की आम्ही स्वतःला त्या स्थितीत आणण्यासाठी चांगले क्रिकेट खेळू.
भारतीय संघ टी20 विश्वचषकामध्ये साखळी फेरीत चार सामने खेळणार आहे. पहिला सामना 5 जून रोजी आर्यलँड विरुद्ध तर टीम इंडीयाचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध 9 जून रोजी होणार आहे. तर तिसरा सामना 12 जून रोजी यजमान अमेरिका विरुद्ध होणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
सुनील गावसकरांनी निवडली, भारतीय संघाची प्लेइंग 11
हे दोन संघ टी20 विश्वचषकात टीम इंडियासाठी ‘घातक’ अद्याप, एकही सामना जिंकण्यात अयशस्वी!
या 5 दिग्गज खेळाडूंचा असू शकतो हा अखेरचा टी20 विश्वचषक, संघात पुन्हा संधी मिळणार नाही