भारतीय क्रिकेट संघ पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु आहे. तो १० नोव्हेंबरला संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडे कूच करेल. याच कारणामुळे सध्या आयपीएलमध्ये खेळत नसलेले भारतीय क्रिकेटपटू आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये शुक्रवारपासून सराव करणार आहेत.
या दौर्यावर भारताला चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळायचे आहेत. वेळापत्रकानुसार भारत ऍडलेडमध्ये दिवस- रात्र कसोटी सामना खेळेल. या दौर्याची सुरुवात वनडे सामन्याने होईल. हे तीनही वनडे सामने 27 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी खेळले जातील.
तीन टी20 सामने ४, ६ आणि ८ डिसेंबर रोजी खेळले जातील. पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून सुरू होईल. मेलबर्नमध्ये दोन्ही संघ बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळतील.
कसोटी संघातील खेळाडू हे गुलाबी चेंडूने दुबईत सराव करणार आहेत. ऍडलेडमध्ये होणाऱ्या दिवस- रात्र कसोटी कसोटी सामन्याच्या तयारीच्या दृष्टीने कसोटीपटू ही तयारी करणार आहेत.
न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी हे फ्लड लाईट्समध्ये सराव करणार आहेत. भारतीय संघाला या कसोटी मालिकेसाठी याप्रकारे सराव करण्याची गरज आहे. सध्या खेळाडूंकडे वेळ असल्याने दुबईत ते हा वेळ सरावाला देणार आहेत. शुक्रवारी होणार सत्र तीन तास चालणार आहे.
भारताचा थ्रो डाऊन तज्ञ रघुला दुबई दौरा कोरोना बाधीत झाल्याने सोडावा लागला. त्यामुळे सत्रात जरी अडचणी येणार असतील तरीही श्रीलंकेचा नुवान सेनेविरत्ने हा संघासोबत आहे. त्याच्या डावाने हाताने केलेल्या थ्रो डाऊनचा भारतीय संघाला मोठा फायदा होणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघात काही चांगले डावखुरे वेगवान गोलंदाज आहे. काहीशा त्याच प्रकारच्या गोलंदाजीचा येथे भारतीय फलंदाज सराव करणार आहेत.
भारत व ऑस्ट्रेलियामध्ये होणारी कसोटी मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया