आशिया चषक 2023 स्पर्धेकडे आशिया खंडासोबतच जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेपूर्वी संघ जोरदार तयारी करताना दिसत आहेत. भारतीय संघाने बंगळुरूच्या अलूर येथे विशेष शिबिरात भाग घेतला. पहिल्या दिवशीच्या या सराव शिबिरात संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी घाम गाळला.
आशिया चषकासाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे हे शिबिर आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलेला. पहिल्या दिवसाच्या सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी तब्बल सहा तास सराव केला. खेळाडूंनी गटागटाने आपल्या कौशल्यांना धार लावली.
रोहित शर्मा व शुबमन गिल या सलामी जोडीने एकसाथ फलंदाजी करत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विराट कोहली व दुखापतीतून ठीक होत असलेल्या श्रेयस अय्यर हे देखील एकत्रितपणे ताळमेळ साधताना दिसले. त्यानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांनी देखील असाच सराव केला. अय्यर प्रमाणेच पुनरागमन करत असलेल्या केएल राहुल याने एकट्याने मात्र बराच काळ फलंदाजी केली. यादरम्यान विराटने फिरकी गोलंदाजांचा विशेष सामना केला. मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज पहिल्या दिवशी हलका सराव करताना दिसले.
यावेळी आशिया चषक पाकिस्तान व श्रीलंका या दोन देशात होणार आहे. मात्र, भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. भारतीय संघाचा अ गटात पाकिस्तान व नेपाळ यांच्यासह समावेश आहे. भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान 2 सप्टेंबर रोजी सामना खेळला जाईल. त्यानंतर सुपर फोर फेरी होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
(Team India Training Camp Ahead Asia Cup In Alur Day 1 Virat Rohit Practice)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक 2023मध्ये संधी न मिळालेल्या भारतीय दिग्गजचा मोठा निर्णय, धरली इंग्लंडची वाट
आशिया कपवर कोरोनाचे सावट! स्पर्धा सुरू होण्याआधीच घडलं असं, लगेच वाचा