भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2022 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ गतविजेता तसेच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून या स्पर्धेत उतरणार आहे. 2018 मध्ये झालेल्या अखेरच्या आशिया चषकात भारत विजेता ठरला होता. भारतीय संघाने मागील दोन्ही आशिया चषक आपल्या नावे केले आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाला आशिया चषक विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याची संधी असेल.
आशिया चषक केवळ दुसऱ्यांदा टी२० प्रकारात खेळला जातोय. यापूर्वी 2016 मध्ये पहिल्यांदा आशिया चषक प्रथमच टी20 प्रकारात आयोजित करण्यात आला होता. सात वेळा आशिया चषक विजेता असलेला भारतीय संघ गेल्या आठ वर्षांपासून आशिया चषकामध्ये अपराजित आहे. मात्र, अखेरच्या वेळी भारतीय संघाला पराभवही पाकिस्तानकडूनच पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा आणखी एकदा नव्याने बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.
भारतीय संघाने 2016 व 2018 आशिया चषक अपराजित राहत जिंकले होते. 2016 आशिया चषकात भारताने सर्वच्या सर्व सहा सामने आपल्या नावावर केलेले. तर, 2018 आशिया चषकातील एका सामन्यात भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध टाय वर समाधान मानावे लागले होते. 2014 मध्ये मात्र भारतीय संघाला अखेरच्या वेळी पाकिस्तानकडूनच पराभूत व्हावे लागलेले. त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानकडून एका धावेने पराभव स्वीकारावा लागलेला. त्याआधी देखील श्रीलंकेकडून हार पत्करावी लागल्याने, भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.
त्यामुळे आता आपली ही आशिया चषकातील विजयाची मालिका 13 पर्यंत वाढवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करताना दिसेल. दुबई येथे 28 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सध्याच्या काळात आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे!’ विराट कोहलीने बाबरवर केला कौतुकांचा वर्षाव
VIDEO: रसेलने ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स; केली युवी अन् पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी






