---Advertisement---

सचिनच्या जिवलग मित्राची प्रकृती बिघडली; चालणे फिरणे झाले कठीण, व्हिडिओ आला समोर

On: मंगळवार, ऑगस्ट 6, 2024 10:15 AM
---Advertisement---

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जिवलग मित्र विनोद कांबळीची प्रकृती अत्यंत वाईट झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विनोद कांबळी चालू शकत नाहीत आणि त्याला आधाराची गरज आहे. 52 वर्षीय विनोद कांबळी यांना अनेक आजार आहेत.

एका युजरद्वारे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी रस्त्याने कुठेतरी पायी जात होते, त्यांना चालताना खूप त्रास होत आहे, त्यांनी आधी बाईकची मदत घेतली, पण त्यांना चालता येत नव्हते, काही वेळाने लोक त्यांना मदत करताना दिसत आहेत. त्याचा हा व्हि़डिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, विनोद कांबळी यांना तातडीने मदतीची गरज आहे. मला आशा आहे की भारतीय क्रिकेटमधील कोणीतरी त्याला मदत करण्यासाठी पुढे येईल. त्याला या अवस्थेत पाहून मन हेलावून जात आहे.

विनोद कांबळीच्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 17 कसोटी सामन्यांमध्ये कांबळीने 1084 धावा केल्या, ज्यात 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे, तर 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये कांबळीने 2 शतके आणि 14 अर्धशतकांसह 2477 धावा केल्या. त्याच्या नावावर 129 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9965 धावा आहेत, ज्यात 35 शतके आणि 44 अर्धशतके आहेत.

हेही वाचा-

बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणा बाहेर! संतप्त आंदोलकांनी माजी कर्णधाराचे घर जाळले
Paris Olympic: नीरज चोप्रासह , हॉकी टीम ॲक्शनमध्ये, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
‘मराठमोळ्या’ अविनाश साबळेने इतिहास रचला, ‘3000 मीटर स्टीपलचेस’च्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---