टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना खेळला जाणार आहे. हा सामना न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होईल. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडला धूळ चारुन स्पर्धे मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिके विरुद्ध लाजीरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले होते. आता दोन्ही संघ रविवारी सामने सामने होणार आहेत.
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीटी बॅट दरवेळी चांगलीच तळपली आहे. आता पुन्हा एकदा विराट कोहलीवर नजर राहणार आहे. त्याचबरोबर कोहली या संघाविरुद्ध विशेष विक्रम करण्याच्या जवळ आहे.
2007 च्या टी-20 विश्वचषकात कोहली टीम इंडियाचा भाग नव्हता. तेव्हापासून तो प्रत्येक आवृत्तीत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळला आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध पाच डावात 308 धावा केल्या आहेत. कोहलीचा या संघाविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. टी20 विश्वचषकात या संघाविरुद्ध कोहली वेगळ्याच लयीत दिसतो, कोहलीने 2012 च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 78 धावा केल्या होत्या, तर 2014 मध्ये त्याने नाबाद 36, 2016 मध्ये नाबाद 55, 2021 मध्ये 57 धावा आणि 2022 च्या टी 20 विश्वचषकात नाबाद ऐतिहासिक 82 धावा केल्या होत्या.
किंग कोहलीने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या पाच डावांत चार अर्धशतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर कोहलीने चार सामन्यांत नाबाद खेळी खेळली आहे आणि जेव्हाही तो नाबाद राहिला आहे तेव्हा भारतीय संघाने तो सामना जिंकला आहे.
कोहली पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मध्ये 500 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 12 धावा दूर आहे. रविवारी कोहली 12 धावा करण्यात यशस्वी ठरला तर या संघाविरुद्ध टी-20 मध्ये 500 धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरेल. पाकिस्तान हा चौथा देश असेल ज्याविरुद्ध कोहली टी-20 मध्ये 500 धावा करण्याचा पराक्रम करेल. विराटने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
श्रीलंकेचा पराभव होऊनही वानिंदू हसरंगानं रचला इतिहास, लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम मोडला
भाजपाच्या विजयाबद्दल केविन पीटरसनच्या मोदींना अनोख्या शैलीत शुभेच्छा!
रोहित शर्मा नेट्समध्ये सरावादरम्यान जखमी! पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार का?