पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सोमावारी इंग्लंडने जिंकली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 9 डिसेंबर रोजी मुलतानमध्ये सुरू झाला होता, जो पाकिस्तानने 26 धावांनी जिंकला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघ 4 बाद 198 धावांवर होता. त्यांना विजयासाठी शेवटच्या डावात 355 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे पाकिस्तान संघ गाठू शकला नाही. या पराभवानंतर पाकिस्तानचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मनसुबा धुळीस मिळाला आहे. मात्र, भारतीय संघ आता कशाप्रकारे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल याचे समीकरण देखील समोर आले.
सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान चॅम्पियनशिपमधून बाहेर पडणारा पाचवा संघ ठरला. आता केवळ ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व भारत हे चारच संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यातही ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास नक्की आहे. त्यांना दक्षिण आफ्रिका व भारत यांच्याविरुद्ध मिळून 7 सामने खेळायचे असून, त्यातील दोन सामने जिंकणे व एक सामना अनिर्णित करणे अनिवार्य आहे.
दुसरीकडे भारत या स्पर्धेत आणखी सहा सामने खेळेल. त्यातील पाच सामने भारताला जिंकायचे आहेत. भारत सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तसेच या गुणतालिकेत श्रीलंका संघ तिसऱ्या स्थानी उभा असून, त्यांचे केवळ दोन सामने होणे शिल्लक आहेत. त्यांना ही मालिका न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये खेळावी लागेल. मात्र, त्यांना हे दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला देखील प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे ते आपली तीन सामन्यांची अखेरची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतील.
(Team India Way To WTC Final After England Win)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान किशनमुळे ‘या’ भारतीय फलंदाजाचे नुकसान, वसीम जाफरने व्यक्त केले मत
धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्याने वापरली ‘ही’ अनोखी पद्धत, सुंदर व्हिडिओ होतोय व्हायरल





