नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी २० सदस्यीय भारतीय कसोटी संघाची निवड केली आहे. १८ ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यासाठी २५ मेपासून भारतातच संघ सरावाला सुरुवात करणार आहे.
तसेच इंग्लंडला रवाना होण्यापुर्वी ८ दिवस भारतीय संघ विलगीकरणात राहणार आहे. त्यानंतर इंग्लंडला पोहोचल्यावरही त्यांना १० दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. आयपीएलप्रमाणे यावेळीही क्रिकेटपटूंना कुटुबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
न्यूज एजन्सी एएनआयला बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “विलगीकरण कालावधीचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. जेणेकरुन २ जूनपर्यंत भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडला पोहोचल्यानंतर सरावास सुरुवात करु शकतील. २५ मे रोजी सर्व सहभागी खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतातच त्यांना ८ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. दरम्यान त्यांच्या चाचण्या केल्या जातील आणि ते दौऱ्यासाठी तयारी करतील.”
“२ जून रोजी इंग्लंडला पोहोचल्यानंतर तिथे त्यांना अजून १० दिवस विलगीकरणात राहावे लागेल. मात्र या कालावधीत त्यांना सराव करण्याची सूट दिली जाईल. कारण सर्व खेळाडूंना भारतातून चार्टर्ड विमानाने इंग्लंडच्या जैव सुरक्षित वातावरणात पोहोचवले जाणार आहे. त्यामुळे बबल टू बबल गेल्याने ते सराव करु शकतील. दरम्यान वारंवार त्यांची कोरोना चाचणी केली जाईल,” असे त्यांनी पुढे सांगितले.
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
India's squad: Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Rohit Sharma, Gill, Mayank, Cheteshwar Pujara, H. Vihari, Rishabh (WK), R. Ashwin, R. Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Bumrah, Ishant, Shami, Siraj, Shardul, Umesh.
KL Rahul & Saha (WK) subject to fitness clearance.
— BCCI (@BCCI) May 7, 2021
Standby players: Abhimanyu Easwaran, Prasidh Krishna, Avesh Khan, Arzan Nagwaswalla
Details 👉 https://t.co/AZhTboIYOR
— BCCI (@BCCI) May 7, 2021
भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! कसोटी चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात निवड झालेला ‘हा’ क्रिकेटपटू कोरोना पाॅझिटिव्ह
“खूप दु:ख होतं, जेव्हा आयपीएलमध्ये ७ वर्षे कोणीही खरेदीदार मिळत नाही,” पुजाराने व्यक्त केल्या भावना
पहिला डोस; शिखर धवनपाठोपाठ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने घेतली कोरोना लस