टी20 विश्वचषकात आज (12 जून) भारतासमोर अमेरिकेचं आव्हान आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील.
याआधी टीम इंडियानं आयर्लंड आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहं. आजच्या सामन्यात अमेरिकेला पराभूत करताच भारतीय संघ सुपर-8 फेरी गाठेल. मात्र या सामन्यात अमेरिकन संघ भारताला कडवी टक्कर देऊ शकतो. अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत करून मोठा अपसेट केला आहे. त्यामुळे टीम इंडियाला सावध राहावं लागेल. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अमेरिकेच्या त्या 5 खेळाडूंबद्दल सांगू, जे टीम इंडियासाठी धोका बनू शकतात.
ॲरॉन जोन्स
ॲरॉन जोन्स या टी20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यानं कॅनडाविरुद्ध शानदार खेळी केली होती. तर पाकिस्तानविरुद्धही महत्त्वाचं योगदान दिलं होतं. हा खेळाडू लांब फटके सहज मारू शकतो. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला त्याच्यापासून सावध राहावं लागेल.
अँड्रिस गॉस
अँड्रिस गॉस हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. तो दक्षिण आफ्रिकेत भरपूर क्रिकेट खेळला आहे. या फलंदाजानं 60 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 42 च्या उत्कृष्ट सरासरीनं धावा केल्या आहेत. याशिवाय टी20 फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एक शतकही आहे.
सौरभ नेत्रावळकर
सौरभ नेत्रावलकर हा भारतासाठी 2010 मध्ये अंडर 19 विश्वचषक खेळला आहे. हा वेगवान गोलंदाज चेंडू दोन्ही दिशेनं स्विंग करण्यात माहीर आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला त्याचा सामना करणं सोपं जाणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सौरभ नेत्रावलकरंच शानदार सुपर ओव्हर टाकून अमेरिकेला विजय मिळवून दिला होता.
नोस्टुश केन्झिगे
या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे तो पॉवरप्ले शिवाय डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी करू शकतो. आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येतं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही सुरुवातीला फिरकीपटूंविरुद्ध अस्वस्थ दिसतात. अशा स्थितीत या सामन्यात दोघांनाही केन्झिगे पासून वाचून रहावं लागेल.
मोनांक पटेल
अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल यानं पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. मोनांक हा खेळपट्टीवर टिकून खेळणारा फलंदाज आहे. न्यूयॉर्कच्या स्टेडियमची खेळपट्टी त्याच्या शैलीच्या फलंदाजीसाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळे या सामन्यात मोनांक पटेल भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
नामिबियाच्या कर्णधारानं केला लाजिरवाणा विक्रम, टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!
कोण आहे पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी करणारा ॲरॉन जॉन्सन? कॅनडाच्या खेळाडूबद्दल मनोरंजक गोष्टी जाणून घ्या
पावसामुळे नेपाळ-श्रीलंकेची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये दाखल