भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. याबाबत आता हालचालींना वेग आला असून, सर्व भारतीय खेळाडू मुंबईमध्ये एकत्रित होण्यास सुरुवात झाली आहे. या संपूर्ण दौऱ्यासाठी भारतापासून इंग्लंडपर्यंत खेळाडूंना किती दिवस विलगीकरणात राहावे लागणार, याबाबत माहिती आता पुढे आली आहे. भारत इंग्लंड दौऱ्यावर प्रथमता १८ जून ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळेल.
या प्रकारे भारतात होणार विलगीकरणाची व्यवस्था
बीसीसीआयच्या योजनेनुसार मुंबईत राहणारे खेळाडू वगळता कसोटी संघात समाविष्ट असलेल्या २० खेळाडूंना बुधवारपासून (१९ मे) इंग्लंडला प्रस्थान करेपर्यंत म्हणजेच तब्बल १४ दिवस मुंबईतील हॉटेलमध्ये वेगळे ठेवण्यात येणार आहे. या बरोबरच सपोर्ट स्टाफचे सदस्य, प्रशिक्षकही यात सहभागी होतील. संघातील सर्व सदस्यांना मुंबईत आणण्यासाठी बोर्डाने चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, २४ मेपासून मुंबईत राहणारे संघाचे सदस्यदेखील बायो बबलमध्ये सामील होतील. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा समावेश आहे. बोर्डाने त्यांना विलगीकरणापासून सात दिवसांची सूट दिली. मात्र, त्यांना घरी विलगीकरणाचे कठोर नियम पाळावे लागतील. इंग्लंड दौर्यासाठी तयार केलेला बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित होता. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने मुंबईत येण्यापूर्वी खेळाडूंच्या तीन कोरोना टेस्ट केल्या आहेत. नकारात्मक अहवाल आल्यानंतरच खेळाडूंना मुंबईतील हॉटेलमध्ये अलग ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
इंग्लंडमध्ये इतके दिवस असणार विलगीकरण
भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडला प्रस्थान करेल. त्यानंतर भारतीय संघ दहा दिवस विलगीकरणात राहील. भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ज्या मैदानावर होणार आहे त्या एजबॅस्टनच्या मैदानाला लागून असलेल्या हॉटेलवर हे खेळाडू राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐकावे ते नवलच! ‘या’ तीन भारतीय भारतीयांना खेळावे लागले होते दुसऱ्या देशासाठी
बॉल टॅम्परिंग प्रकरणाची हवा तापली, स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला मारला ‘हा’ टोला