कोलंबो| शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात वनडे मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ७ विकेट्सने जिंकत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज (२० जुलै) श्रीलंका आणि भारत दुसरा वनडे खेळण्यासाठी मैदानावर उतरतील. पाहुणा भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखत या सामन्यासह मालिकाही खिशात घालण्याच्या इराद्यात असेल. हा सामना जिंकत भारतीय संघाकडे बरेचसे विक्रम आपल्या नावावर करण्याचीही संधी असेल.
पाकिस्तानला पछाडेल भारतीय संघ
जर आज ‘धवन आणि कंपनी’ने दुसऱ्या वनडेत श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली तर भारत श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे सामना जिंकणारा संघ बनेल. १९७९ ते आतापर्यंत भारताने श्रीलंकेला ९२ वनडे सामन्यात पराभूत केले आहे. याबाबतीत भारताचा कट्टर विरोधक असलेला पाकिस्तान संघ संयुक्तपणे प्रथमस्थानी आहे. दुसरा वनडे जिंकत भारताच्या खात्यात सर्वाधिक ९३ वनडे सामना विजयांची नोंद होईल.
तिन्ही स्वरुपात भारतीय संघ बनेल अव्वल
याबरोबरच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातही श्रीलंकेला सर्वाधिक वेळा पराभूत करणारा संघ बनेल. आतापर्यंत भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे, टी२० आणि कसोटीत मिळून सर्वाधिक १२५ विजयांची नोंद केली आहे. याबाबतही पाकिस्तान संघ भारताच्या बरोबरीवर आहे. त्यामुळे दुसरा वनडे जिंकत पाकिस्तानला मागे टाकण्याची ही भारताकडे नामी संधी असेल. (Team India Will Surpasses Pakistan And Other Teams By Winning Second ODI Against Sri Lanka)
इतर संघाबाबत बोलायचे झाल्यास, कोणत्याही संघाला १०० विजयांचाही आकडा गाठता आला नाही. भारत-पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलिया ८८ सामना विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे.
सलग दहावा वनडे जिंकण्याचा विक्रम
भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धची आतापर्यंतची आकडेवारी अतिशय प्रशंसनीय आहे. मागील ९ वर्षांपासून म्हणजे २०१२ पासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहिला आहे. भारताने श्रीलंकेला सलग ९ वनडेत पराभूत केले आहे. अशात दुसरा वनडे जिंकत भारत श्रीलंकेविरुद्ध सलग १० वनडे सामने जिंकण्याचा पराक्रम करेल.
कुंबळे अन् बेदी यांच्यावर वरचढ ठरेल धवन
नवनियुक्त कर्णधार शिखर धवनने पहिला वनडे जिंकत विक्रमांची रास लावली आहे. यानंतर दुसरा वनडेही जिंकत तो मोठमोठे विक्रम मोडू शकतो. जर त्याने हा महत्त्वपुर्ण सामना जिंकला तर तो बिशन सिंग बेदी आणि अनिल कुंबळे यांसारख्या दिग्गजांना पछाडेल. आतापर्यंत बेदी आणि कुंबळे यांनी श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी १ वनडे सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही
भुवनेश्वर-हार्दिकच्या जोडीवर सर्वांचे लक्ष, मनीष पांडेऐवजी ‘या’ युवा खेळाडूला मिळू शकते संधी