---Advertisement---

T20WC2026: टीम इंडियाचा विश्वचषक विजय! कर्णधार सूर्यकुमार सर्वात अनुभवी, तर 23 वर्षांचा हा स्टार ठरला सर्वात तरुण खेळाडू

On: सोमवार, मार्च 9, 2026 6:23 PM
---Advertisement---

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक आयसीसी टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला आहे (Team india won the world cup 2026). यावेळच्या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, बीसीसीआयने निवडलेल्या प्रत्येक खेळाडूला किमान एक तरी सामना खेळण्याची संधी मिळाली आणि प्रत्येकाने विजयात काही ना काही योगदान दिले. या ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय संघातील सर्वात वयाने मोठा आणि सर्वात तरुण खेळाडू कोण आहे.

भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव हा या संघातील सर्वात वयाने मोठा खेळाडू आहे. त्याचे वय सध्या साधारण 35 वर्षे आहे. एक-दोन सामने वगळता या विश्वचषकात सूर्याची बॅट फारशी तळपली नाही. विशेष म्हणजे, फायनलमध्ये तो शून्यावर बाद झाला होता. आता सूर्या किती काळ क्रिकेट खेळणार, हे त्याच्या फॉर्मवर अवलंबून असेल. जर त्याची बॅट चालली तर तो पुढचा विश्वचषक खेळू शकतो, अन्यथा त्याला निवृत्तीचा विचार करावा लागू शकतो.

कर्णधार सूर्यकुमार यादव हा या संघातील सर्वात वयाने मोठा खेळाडू आहे, त्याचे वय सध्या सुमारे 35 वर्षे आहे. सूर्यानंतर 34 वर्षांचा वरुण चक्रवर्ती हा वयाने मोठा खेळाडू ठरतो. त्यानंतर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे सर्व खेळाडू एकाच वयोगटातील असून ते 32 वर्षांचे आहेत. संघातील इतर खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे 31 वर्षांचे आहेत. युवा खेळाडूंमध्ये रिंकू सिंग 28 वर्षांचा, तर ईशान किशन आणि अर्शदीप सिंग हे सुमारे 27 वर्षांचे आहेत. वॉशिंग्टन सुंदर 26 वर्षांचा आणि अभिषेक शर्मा 25 वर्षांचा आहे. या संपूर्ण विश्वविजेत्या संघातील सर्वात तरुण खेळाडू तिलक वर्मा असून त्याचे वय केवळ 23 वर्षे आहे.

टी-20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होतो. 2024 मध्ये चॅम्पियन ठरलेले अनेक खेळाडू याही वर्षी विजेते ठरले आहेत. त्याचप्रमाणे, सध्याच्या संघातील अनेक तरुण खेळाडू 2028 च्या विश्वचषकातही खेळताना दिसू शकतात. दोन वर्षांनंतर संघाचे स्वरूप कसे असेल हे सांगणे कठीण असले तरी, यातील काही खेळाडू तोपर्यंत नक्कीच संघात असतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---