वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी२० सामना शुक्रवारी (२९ जुलै) ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद येथे झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे नतमस्तक झाले आणि भारताने वेस्ट इंडिजवर ६८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावा केल्या. भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० षटकात ८ विकेट्स गमावत १२२ धावाच करता आल्या.
भारताच्या १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. वेस्ट इंडिजकडून कोणत्याही फलंदाजाला साध्या २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. सलामीवीर शामराह ब्रूक्स याने सर्वाधिक २० धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरन १८ धावाच करून बाद झाला. इतरांना विशेष योगदान देता आले नाही. परिणामी वेस्ट इंडिजचा संघ धावांवरच गुंडाळला गेला.
या डावात भारताकडून अर्शदीप सिंग, आर अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार व रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट काढली.
तत्पूर्वी भारताकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहितने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४४ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. या खेळीसह तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. रोहितच्या खात्यात संध्या ३४४३ टी२० धावांची नोंद आहे. रोहितनंतर दिनेश कार्तिकने ताबडतोब खेळी खेळली. त्याने १९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या.
तसेच सूर्यकुमार यादवने २४, रविंद्र जडेजाने १६ आणि रिषभ पंतने १४ धावांचे योगदान दिले. या डावात वेस्ट इंडिजकडून पदार्पणवीर अल्झारी जोसेफने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच किमो पॉल, ओबेद मॅकॉय, जेसन होल्डर, अकिल हुसेन यांनीही प्रत्येकी एक विकेट काढली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्याचा धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, आगळ्यावेगळ्या फटक्याला पाहून व्हाल अचंबित
माणुसकी कशाला म्हणतात सॅमसनकडून शिका! पत्रकाराला टीम बसमधील आपली सीट द्यायला झालेला तयार
‘टी२० विश्वचषकासाठी आम्ही तयारच, फक्त काही…’ कॅप्टन रोहितचे मोठे विधान