---Advertisement---

असा खेळाडू पुन्हा होणे नाही; युवराज सिंगने क्रिकेट करिअरमध्ये जिंकल्या चक्क इतक्या ट्राॅफ्या! एकदा पाहाच

On: रविवार, जुलै 14, 2024 11:48 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज युवारज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीयसंघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सनी पराभव करुन ट्राॅफी वर कब्जा केला आहे. या विजायामुळे सोशल मीडियावर युवराज सिंगच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. ज्यामध्ये युवराजने आपल्या कारकिर्दीत जिंकलेल्या ट्राॅफीची माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया युवराज सिंगने आतापर्यंत कोणत्या कोणत्या ट्राॅफी जिंकल्या आहेत.

2007 आणि 2011 च्या विश्वचषकातील भारतीय संघाचा विजयाचा हिरो युवराज सिंगने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक ट्राॅफी जिंकल्या आहेत. युवीने अंडर-15 पासून ते एकदिवसीय विश्वचषकापर्यंत जवळपास सर्व महत्तवाच्या स्पर्धे जिंकलेल्या संघाचा हिस्सा राहिला आहे. युवाराज सिंगने जिंकलेल्या याप्रमाणे-

15 वर्षांखालील विश्वचषक.
19 वर्षांखालील विश्वचषक
टी20 विश्वचषक
एकदिवसीय विश्वचषक
चॅम्पियन्स ट्रॉफी
आयपीएल ट्रॉफी
दुलीप ट्रॉफी
साळवे चॅलेंजर्स ट्रॉफी
बीसीसीआय कॉर्पोरेट ट्रॉफी
इराणी कप
टी10 लीग
रस्ता सुरक्षा करंडक
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे ट्रॉफी

भारतीय संघाचा हा माजी महान खेळाडू 03 ऑक्टोबर 2000 साली टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. युवारज सिंगने केनिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय डेब्यू केले होते. तर 13 स्पटेंबर 2007 मध्ये टी20 मध्ये स्काॅटलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय डेब्यू केले होते. 2007 च्या पहिल्याच विश्वचषकात युवीने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडला 6 चेंडूत 6 षटकार ठोकून विश्वविक्रम केले होते. तर 2011 च्या विश्वचषकातील युवराजचे सिंगचे योगदान भारतीय चाहते विसरणे कठीण आहे. त्याच्या शानदार कामगिरीमुळे स्पर्धेचा मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आले होते.


युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स संघाला 5 विकेट्सनी मात देत ट्राॅफी वर नाव कोरले आहे. पाकिस्तानने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 19.1 षटकात सामन्यावर विजय मिळवले. साामनावीर अंबाती रायडूने सर्वाधिक 50 धावा केल्या.

महत्तवाच्या बातम्या-

दादा यावेळी थेटच म्हणाले, “भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे….”
ठरलं! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज दिसणार नव्या टीममध्ये, यासंघांसोबत रिकी पाँटिंगची लागणार वर्णी?
IND VS ZIM, टीम इंडियाच्या विजयानंतर गिल ठरला खलनायक, चाहत्यांनी केला हा थेट आरोप

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---