---Advertisement---

टीम इंडियासाठी टी20 मध्ये शतक ठोकणारा स्टार फलंदाज अडकला लग्न बंधनात

On: शुक्रवार, जुलै 19, 2024 4:23 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा क्रिकेटर तसेच आयपीएल मधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा स्टार फलंदाज दिपक हुड्डा आखेर लग्न बंधनात अडकला आहे. वयाच्या 29 व्या वर्षी दिपकने हिमाचल मधील एका मुलीशी लग्न केला आहे. हुड्डाने सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर आपल्या लग्नामधील फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

दिपक हुड्डाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहले , नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, प्रत्येक क्षण, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक संभाषण आम्हाला या सुंदर दिवसाकडे घेऊन गेले. माफ करा जर आपण एकमेकांना थोडा वेळ धरून राहिलो तर, विणकामाच्या कथा फक्त आपल्या अंतःकरणाला ऐकू येतात आणि जर आपण थोडे हरवलेले दिसले तर, कारण शेवटी आपण एकमेकांना सापडलो आहोत.

घरी आपले स्वागत आहे, माझी छोटी-छोटी हिमाचली मुलगी

कुटुंब आणि मित्रांच्या उबदारपणाने वेढलेले आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमची कायमची सुरुवात केली. आमचे मन भरून आले आहे, तुम्हा सर्वांचे आभार.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Hooda (@deepakhooda30)

दिपक हुड्डाने आतापर्यंत भारतीय संघासाठी 21 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एक शतकी खेळीच्या जोरावर 368 धावा केल्या आहेत. फलंदाजीसह हुड्डा पार्ट टाइम फिरकीपटु देखील आहे. त्याने 21 सामन्यांमधील 8 डावांत गोलंदाजी करताना 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसरीकडे आयपीएल मध्ये  हुड्डाने 118 साामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने जवळपास 130 च्या स्ट्राइक रेटने 1465 धावा केल्या आहेत. त्याच दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 10 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आज खेळला जाणार क्रिकेटचा सर्वात मोठा सामना! आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामने-सामने
हार्दिक पांड्याला घटस्फोटानंतर नताशाला द्यावा लागणार संपत्तीतील 70% वाटा?
‘माझ्याकडे दुर्लक्ष झालं.. मन दुखलं.. खोलीत बसून रडलो…’, टीम इंडियात स्थान मिळाल्यावर हर्षित राणा झाला भावूक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---