भारतीय संघ (team india) सध्या एकापाठोपाठ एक मालिका खेळत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिका संपल्यानंतर संघ आता लखनऊमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आता मायदेशात टी२० आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर संघ लखनऊमध्ये पोहोचला आहे, ज्याठिकाणी पहिला टी२० सामना खेळला जाईल. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
मागच्या वर्षी भारतीय संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त होते. आता चालू वर्षातही संघाला अतिरिक्त वेळ मिळणार नाहीय. याच कारणास्तव बीसीसीआय खेळाडूंना वेळोवेळी विश्रांतीही देत आहे. असे असले तरी कोरोना विषाणूचा धोका अजूपर्यंत संपलेला नाही आणि खेळाडूंना सर्व सामने हे बायो बबलमध्येच खेळायचे आहेत. असेच काहीसे चित्र लखनऊमध्ये पाहायला मिळाले. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी लखनऊमधील हॉटेलमध्ये दाखल झाला आहे. याठिकाणी कडक बायो बबलचे नियोजन केले गेले आहे. तसेच खेळाडूही सर्व नियमांचे पालन करत आहेत. सर्व खेळाडूंच्या तोंडावर मास्क दिसत आहे. अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून बीसीसीआयने भारतीय संघाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/tv/CaP2JjMAroW/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात मायदेशात टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली. सुरुवातील खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला ३-० असा क्लीन स्वीप मिळाला. त्यानंतर खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत सर्व सामने देखील भारतानेच जिंकले आणि वेस्ट इंडीज पुन्हा एकदा ३-० अशा फरकाने पराभूत झाला. एकंदरीत पाहता वेस्ट इंडीज संघासाठी हा भारत दौरा खूपच निराशाजनक राहिला.
भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारी टी२० आणि कसोटी मालिका देखील मायदेशातच खेळली जाणार आहे. सुरुवातील उभय संघातील तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. टी२० मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारीला लखनऊमध्ये खेळला जाईळ. त्यानंतर पुढचे दोन टी२० सामने २६ आणि २७ फेब्रुवारीला धर्मशालामध्ये खेळले जातील. यानंतर उभय संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना ४ मार्चपासून मोहालीमध्ये, तर दुसरा सामना १२ मार्चपासून बेंगलोरमध्ये खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
युवा ऋचा घोषचा न्यूझीलंडविरुद्ध झंझावात! तुफानी अर्धशतकासह मोडला १४ वर्ष जुना विक्रम
पाकिस्तानी गोलंदाजाने भडकावली सहकार्याच्या श्रीमुखात! पीएसएलमधील व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाकडून गोलंदाजी प्रशिक्षक बदलण्याची मागणी; ‘या’ दिग्गजाचे सुचविले नाव