---Advertisement---

IND vs SA: पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 101 धावांनी दणदणीत विजय! हार्दिक-बुमराहची चमकदार कामगिरी

On: मंगळवार, डिसेंबर 9, 2025 10:29 PM
---Advertisement---

टीम इंडियाने टी-20 मालिकेची सुरुवात जोरदार केली आहे. कटकच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी धुव्वा उडवला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 175 धावा केल्या. फलंदाजीत हार्दिक पांड्याने (Hardik pandya) 28 चेंडूत 59 धावांची वादळी खेळी केली. 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, संपूर्ण प्रोटियाज (दक्षिण आफ्रिका) संघ फक्त 74 धावांवर ऑलआऊट झाला.
हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सर्वात कमी स्कोर आहे.

गोलंदाजीत अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अर्शदीप सिंगने क्विंटन डी कॉकला खाते उघडण्यापूर्वीच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार ट्रिस्टन स्टब्स (14 धावा) यालाही अर्शदीपने बाद केले. कर्णधार एडम मार्करम (14 धावा) अक्षर पटेलच्या आत येणाऱ्या चेंडूला समजण्यात अपयशी ठरला आणि क्लीन बोल्ड झाला. डेवाल्ड ब्रेव्हिसला चांगली सुरुवात मिळाली, पण तो 22 धावांवर बुमराहच्या चेंडूवर सूर्यकुमारकडे झेल देऊन बसला.

यानंतर, प्रोटियाज संघाच्या फलंदाजांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतण्याची जणू स्पर्धाच लागली आणि संपूर्ण संघ बघता बघता केवळ 74 धावांवर ऑलआऊट झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---