---Advertisement---

IND vs SL: श्रीलंका पोहोचताच टीम इंडियाचा विजयासाठी मास्टर प्लॅन! या कमकुवत बाजू दूर करण्यासाठी कसून सराव

On: बुधवार, ऑगस्ट 5, 2026 7:19 PM
---Advertisement---

श्रीलंका दौऱ्याच्या सुरुवातीपूर्वी टीम इंडियामध्ये (Team india) अनेक त्रुटी किंवा कमकुवत बाबी दिसून येत आहेत. ज्यामुळे संघ खूप जास्त दबावाखाली असल्याचे दिसत आहे. सध्या संघावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. 15 ऑगस्टपासून (2 Test match between IND vs SL) सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी भारतीय संघ या उणिवा दूर करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आता संघाने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

श्रीलंका पोहोचल्यानंतर संघाने विजयासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून संघावरील दबाव कमी करता येईल.

श्रीलंका पोहोचल्यानंतर टीम इंडियाने 5 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा सराव केला. जिथे संघाच्या नियोजनात मोठा बदल पाहायला मिळाला. पहिल्या दिवसाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत (Rishbh Pant) विकेटकीपिंग करताना दिसत आहे. तर पहिल्या स्लिपमध्ये कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) दिसत आहे, तसेच दुसऱ्या स्लिपमध्ये केएल राहुल आणि तिसऱ्या स्लिपमध्ये त्यांचा ओपनिंग पार्टनर यशस्वी जयस्वाल दिसत आहे.

याशिवाय, बॅकअप विकेटकीपर ध्रुव जुरेलला (Dhruv Jurel) संघाने चौथ्या स्लिपमध्ये उभे केले आहे. अलीकडच्या काळात टीम इंडियाने स्लिपमध्ये अनेक कॅच सोडले आहेत. स्लिपची फिल्डिंग खराब असल्यामुळे संघाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अशा स्थितीत संघाने ही उणिव दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, जेणेकरून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान स्लिपमध्ये कॅच सुटणार नाहीत.

या दौऱ्यावरील दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला फिरकीला अनुकूल अशी खेळपट्टी मिळणार आहे. अशा स्थितीत फिरकी गोलंदाजांविरुद्ध स्लिपमध्ये अनेक संधी निर्माण होणार आहेत. जर टीम इंडियाने स्लिपमध्ये चांगले कॅच पकडून दबाव निर्माण केला, तर श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरू शकते. अशा परिस्थितीत कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and Gautam Gambhir) आणि हेड कोच गौतम गंभीर यांना या दिशेने काम करताना पाहून हे स्पष्ट झाले आहे की, संघ एकामागून एक सर्व त्रुटींवर काम करणार आहे. या मालिकेबाबत सध्या खेळाडू आणि संघ व्यवस्थापन दोघेही गंभीर असल्याचे दिसून येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---