---Advertisement---

टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

On: शुक्रवार, नोव्हेंबर 20, 2020 7:48 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान घातक गोलंदाज मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद घोऊस यांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. हैदराबाद येथील एका रुग्णालयात सिराजच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे भारतीय क्रिकेट संघासह प्रशिक्षण घेत असलेल्या २६ वर्षीय सिराजने सराव सत्रातून परतल्यानंतर ही बातमी ऐकली.

स्पोर्ट्सस्टार डॉट कॉमशी बोलताना तो म्हणाला, “माझे वडिलांची नेहमी इच्छा होती की, ‘माझा मुलगा, देशाचे नाव रोशन कर.’ आणि मी हे निश्चितच करेल.”

“हे आश्चर्यकारक आहे. मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा आधार गमावला. मला देशाकडून खेळताना पाहणे हे त्यांचे स्वप्न होते आणि मला आनंद झाला की त्या मार्गाने मला हे जाणवले आणि मला आनंद झाला,” असे त्याने पुढे बोलताना म्हटले.

क्वारंटाईन ठेवण्याच्या नियमांमुळे सिराज अंत्य संस्कारांसाठी भारतात जाऊ शकणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सिराजने आतापर्यंत भारतीय संघाकडून केवळ १ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याला केवळ टी२० क्रिकेटमध्ये ३ विकेट्स घेण्यात यश मिळाले आहे.

नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२० मध्ये त्याने अफलातून कामगिरी केली. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून ९ सामने खेळताना ११ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

मोहम्मद सिराजच्या घातक चेंडूवर पृथ्वी शॉ क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर

मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---