---Advertisement---

व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची कामगिरी भारीच! आकडेवारी एकदा पाहाच

On: मंगळवार, जुलै 21, 2026 1:56 PM
---Advertisement---

नुकत्याच झालेल्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय टी 20 संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे. या दौऱ्यात भारताच्या प्रशिक्षणामध्ये बदल झाला आहे. संघ गौतम गंभीर नाही, तर व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या मार्गदर्शनाखाली या मालिकेत खेळणार आहे. लक्ष्मण काही पहिल्यांदाच भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार नाही. त्याने याआधीही ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे.

लक्ष्मणने 2022 मध्ये सर्वप्रथम भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. तेव्हा भारताने आयर्लंड दौऱ्यातील दोन्ही टी 20 सामने जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर संघ टी 20 फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप स्पर्धेतही लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली खेळला. संघाने यामधील 5 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल
भारत लक्ष्मणच्या प्रशिक्षणाखाली 2023 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळला. टी 20 प्रकारच्या त्या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक पटकावले होते.

झिम्बाब्वे दौऱ्याचाही अनुभव
भारत लक्ष्मणच्या प्रशिक्षणाखाली 2024 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावरही गेला होता. पाच सामन्यांच्या त्या टी 20 मालिकेत भारत 4-1 असा जिंकला होता.

लक्ष्मणच्या प्रशिक्षणाखाली भारताची वनडे कामगिरीची जबरदस्त
लक्ष्मणने केवळ भारताच्या टी 20 संघाचेच प्रशिक्षकपद सांभाळले नाही, तर वनडे प्रकारातही मार्गदर्शन दिले आहे. 2022 मध्ये भारताने लक्ष्मणच्या प्रशिक्षणाखाली झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत लक्षवेधी कामगिरी केली होती. तीन सामन्यांची ती वनडे मालिका भारताने 3-0 अशी जिंकली होती.

भारताच्या टी 20 संघाची कामगिरी मागील दोन मालिकांपासून निराशाजनक झाली. त्यामुळे संघ झिम्बाब्वे दौऱ्याची कशी सुरूवात करतो, याकडे लक्ष असणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना 23 जुलैला खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 25 जुलै आणि तिसरा सामना 26 जुलैला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवर पार पडणार आहेत. (Team India performance under VVS Laxman’s guidance has been outstanding! Just take a look at the stats.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---