---Advertisement---

आता बदलणार टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन; झिम्बाब्वेविरुद्ध ‘या’ 11 खेळाडूंना संधी मिळणे निश्चित!

On: सोमवार, फेब्रुवारी 23, 2026 7:50 PM
---Advertisement---

टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर-८ फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला. आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात.

​भारताचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. झिम्बाब्वे हा संघ जरी लहान वाटत असला, तरी त्यांनी या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या मोठ्या संघांना पराभूत करून सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारतीय संघ झिम्बाब्वेला अजिबात हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.

​चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी (Spinners) पोषक मानली जाते. येथे फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळते. अशा परिस्थितीत टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकते. याशिवाय अक्षर पटेलचेही संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळवले जात होते, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आता अक्षरची वापसी नक्की मानली जात आहे.

​अभिषेक शर्मासाठी २०२६ चा टी-२० वर्ल्ड कप एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. आतापर्यंत त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता अभिषेकच्या जागी संजू सॅमसनला खेळवण्याची मागणीही होऊ लागली आहे. मात्र, संघ व्यवस्थापन अभिषेकवर आपला विश्वास कायम ठेवू शकते; अशा स्थितीत सॅमसनला आणखी वाट पाहावी लागेल. सध्या तरी संघात दोन बदलांची शक्यता असून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---