जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू होणार आहे. मायदेशातील या मासिकेसाठी भारतीय संघ आतापासून तयारीत आहे. मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये सुरू होईल. इंग्लंडविरुद्धची ही मालिका पाच सामन्याची असून पहिल्या दोन सामन्यांसाठी शुक्रवारी (12 जानेवारी) भारतीय संघ घोषित केला गेला.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात तीन यष्टीरक्षक फलंदाजांना संधी दिली गेली आहे. हे तीन यष्टीरक्ष म्हणजे केएल राहुल, केएस भरत आणि ध्रुव जुरेल. यातील ध्रुव याला पहिल्यांदाच भारतीय संघात निवडले गेले आहे. वरच्या फळीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), शुबमन गिल Shubman Gill) आणि यशस्वी जयस्वाल ही अनेक्षित नावे आहेत. विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. श्रेयस अय्यर यालाही संघात घेतले गेले आहे.
Maiden call for Dhruv Jurel as wicket keeper batter in England Test series.
– He has 46.47 average in FC, did well for UP & India A. pic.twitter.com/RBceGX3cZI
— Johns. (@CricCrazyJohns) January 12, 2024
रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या चार फिरकीपटू खेळाडूंना संघात स्थान दिले गेले आहे. भारतीय खेळपट्टीवर या चौघांची फिरकी गोलंदाजी इंग्लंडसाठी मोठी बाधा ढरू शकते. सोबतच अश्विन, जडेजा आणि अक्षर हे तिघे फलंदाजीतही योगदान देऊ शकतात. संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमाणात मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान या चौघांना निवडले गेले आहे.
???? NEWS ????#TeamIndia‘s squad for the first two Tests against England announced ????
Rohit Sharma (C ), S Gill, Y Jaiswal, Virat Kohli, S Iyer, KL Rahul (wk), KS Bharat (wk), Dhruv Jurel (wk), R Ashwin, R Jadeja, Axar Patel, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Jasprit…
— BCCI (@BCCI) January 12, 2024
इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेला भारतीय संघ भक्कन दिसत आहे. पण यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या कसोटी स्पेशलिस्ट फलंदाजांना या संघात निवडले गेले नाहीये. इंग्लंडविरुद्धची ही मालिका भारतीय संघासाठी नेहमीच महत्वाची ठरली आहे. रहाणे आणि पुजारा ही जोडीने अनेकदा संघासाठी मॅच विनरची भूमिकाही पार पाडली. पण यावेळी संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी अनुभवी फलंदाजांना संघातून वगळले आहे. चाहत्यांमध्ये पुजारा आणि रहाणेला संघात स्थान न दिल्यामुळे नाराजी पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी विभागात मोहम्मद शमी () भारतीय संघासाठी महत्वाचा गोलंदाज होता. पण माहितीनुसार शमीला फिटनेसच्या कारणास्तव पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये निवडले गेले नाहीये.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
(Team India’s squad for the first two Tests against England announced)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत जिज्ञासा, सानिका उपांत्य फेरीत
इंग्लंडमधील लीड्स बेकेट विद्यापीठाचे विद्यार्थी आयएसएमएस इन्स्टिट्यूटला भेट देणार






