fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडियाच्या नावावर आहेत हे ५ अतिशय खराब विक्रम

विक्रम हे विक्रम असतात. क्रिकेटमध्ये विक्रमांना अतिशय महत्त्व असते. ते जर चांगले विक्रम असतील तर नक्कीच आनंदाची गोष्ट असते. परंतु ते विक्रम हे जर नकोशे असतील तर…

या लेखात टीम इंडियाच्या नावावर असलेल्या नकोशा विक्रमांची आपण चर्चा करणार आहोत.

५. कसोटी विजयांपेक्षा पराभव जास्त

टीम इंडियाने पहिला कसोटी सामना हा १९३२ साली खेळला. त्यानंतर आजपर्यंत भारताने एकूण ५४२ कसोटी सामने खेळले असून त्यात १५७ विजय व १६७ पराभव पाहिले आहेत. २१७ सामने अनिर्णित राहिले असून १ सामना टाय राहिला आहे. कसोटीत सर्वाधिक पाहणाऱ्या १२ संघापैकी भारत ५व्या स्थानावर आहे.

४. वनडेत सर्वाधिक पराभव पाहिलेला संघ

भारतीय संघाने वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक पराभव पाहिले आहेत. भारतीय संघाने वनडेत सर्वाधिक ९८७ वनडे सामने खेळले असून त्यात एकूण ४२४ पराभव पाहिले आहेत. ५१३ सामन्यात संघाने विजय मिळवला असून ९ सामने टाय तर ४१ सामने अनिर्णित राहिले आहेत.

३. वनडेतील निचांकी धावा ५४

२९ ऑक्टोबर २००० रोजी भारतीय संघ शारजाहमध्ये संघात सचिन, युवराज, गांगुली व कांबळीसारखे दिग्गज असताना श्रीलंकेविरुद्ध ५४ धावांत सर्वबाद झाला होता. २९९ धावांचा पाठलाग करताना तब्बल २४५ धावांनी भारताला पराभव पहावा लागला होता. ५४ ही भारतीय संघाची वनडेतील निचांकी धावसंख्या असून जगातील वनडेतील ही ७व्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे.

२. कसोटीत ४२ धावांवर सर्वबाद

२४ जुन १९७४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध ४२ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने लाॅर्ड्स कसोटीत पहिल्या डावात ६२९ धावा केल्यानंतर भारताचा पहिला डाव ३०२ तर दुसरा डाव ४२ धावांवर संपुष्टात आला. हा कसोटी सामना भारताने १ डाव व २८५ धावांनी गमावला. तेव्हा भारतीय संघात सुनिल गावसकर, फारुक इंजिनीअर, अजित वाडेकर, गुंडप्पा विश्वनाथ, ब्रिजेश पटेल, एकनाथ सोलकर हे मोठे खेळाडू होते. ही भारताची कसोटी क्रिकेटमधील निचांकी धावसंख्या असून कसोटी इतिहासातील ५वी निचांकी धावसंख्या आहे.

१. परदेशात १५४ कसोटीत पराभव

भारतीय संघ परदेशात एकूण २७० कसोटी सामने खेळला असून त्यात ५१ विजय व ११५ पराभव संघाने पाहिले आहेत. तसेच १०४ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे. परदेशात १०० पराभव पाहणाऱ्या ६ संघांपैकी भारत चौथ्या स्थानी आहे.

ट्रेडिंग घडामोडी –

हर्षा भोगले असे काय बोलले, ज्यामुळे धोनीचे चाहते झाले नाराज

विश्वचषकात आजपर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केलेले ७ कर्णधार व त्यांची कामगिरी

टॉप 5: आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक

वसिम जाफरच्या आयपीएल ड्रीम ११चा धोनी कर्णधार, बाकी १० खेळाडू आहेत असे

५ असे विक्रम, जे अजूनही वनडे क्रिकेटमध्ये कुणी केले नाहीत

You might also like