कोरोना व्हायरसचे सावट जगभरात पसरले आहे. याच व्हायरसमुळे आता जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. याबरोबरच भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी आयपीएलचे आयोजन २९ मार्चला होणार होते.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) या स्पर्धेतून पुनरागमन करणार होता. परंतु आता आयपीएल स्थगित केल्यामुळे त्याच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच आता भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी आपले मत मांडेल आहे.
हर्षा म्हणाला की, “जेव्हा त्याने कर्णधारपदाचा त्याग केला होता किंवा जेव्हा तो कसोटी क्रिकेटपासून दूर होता तेव्हा मी म्हणालो होतो की, धोनी क्रिकेटमधून बाहेर पडण्याला अजिबात मानणार नाही. एक दिवस तुम्हाला समजेल की धोनी गेला आहे. तो शांतपणे दूर गेलेला असेल पण तो स्वत: चे काम करत असेल. म्हणूनच मला वाटते की त्याच्या भारताविषयीची महत्त्वाकांक्षा संपली आहे.”
“मला असे वाटत नाही की धोनी यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकात (T20 World Cup) खेळू शकेल. कदाचित त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर तो हे करेल. अशी माझी भावना आहे,” असेही हर्षा म्हणाला.
मागील वर्षी २०१९च्या जुलैमध्ये वनडे विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धोनी खेळताना दिसला होता. परंतु या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर धोनी एकदाही क्रिकेट खेळताना दिसला नाही.
धोनीला आयपीएल २०२०ला (IPL2020) सुरुवात होण्यापूर्वी सराव करताना पाहिले होते. परंतु कोरोना व्हायरसचा (Corona Virus) धोका पाहता तो आपल्या घरी रांचीला गेला. आयपीएल धोक्यात आल्यामुळे विश्वचषकात खेळण्याची त्याची शक्यता सध्यातरी कमी आहे
ट्रेंडिंग घडामोडी-
-संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत केलेले ५ क्रिकेटर्स
-सुरेश रैना सीएसकेसाठी करतो हे खास काम, मोठ्या खेळाडूने केला खुलासा