आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉऊंसिल अर्थात आयसीसीने महिला विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची यादी घोषित केली आहे. त्यात भारतीय संघातील ३ खेळाडूंचा समावेश आहे.
या संघाचं नेतृत्व भारताची कर्णधार मिताली राजकडे देण्यात आले आहे. तर अन्य खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
सलामीवीर म्हणून इंग्लंडच्या तामसीन बोमोंट (४१० धावा ) आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वर्डत (३२४ धावा ) यांचा समावेश करण्यात आला आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी भारतीय कर्णधार राजचा (४०९ धावा ) समावेश करण्यात आला आहे. मितालीकडेच या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
इल्लीसे पेरी या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. तिने ४०४ धावा या स्पर्धेत केल्या आल्या आहेत तसेच ९ विकेट्स घेतल्या आहेत.
यष्टीरक्षक म्हणून अपेक्षितपणे इंग्लंडच्या सारा टेलरचा समावेश केला आहे. ४ झेल आणि २ यष्टिचित बरोबर तिने ३९६ धावा देखील केल्या आहेत. स्पर्धेत अंतिम चरणात अर्थात उपांत्यफेरी आणि अंतिम फेरीत चमक दाखवणाऱ्या हरमनप्रीत कौरचा ६व्या क्रमांकासाठी समावेश करण्यात आला आहे. तिने ३५९ धावा करताना ५ बळी देखील मिळवले आहे.
तिसऱ्या भारतीयाच्या रूपाने दीप्ती शर्माला या या संघात स्थान देण्यात आले आहे. या अष्टपैलू खेळाडूने २१६ धावा आणि १२ बळी स्पर्धेत घेतले आहेत.
संघात गोलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या मारिझनने कप्प (१३ बळी ), डने वॅन निएकेरक (१५ बळी आणि ९९ धावा ), अन्या श्रुबसोले (१२ बळी ) आणि अॅलेक्स हार्टली (१० बळी यांचा समावेश करण्यात आला आहे.
१२व्य खेळाडूच्या जागी इंग्लंडची नताली स्किव्हर हीच समावेश करण्यात आला आहे. तिने स्पर्धेत ७ बळी आणि ३६९ धावा केल्या आहेत.